घरताज्या घडामोडीइमरान हाश्मीचा नवा म्युझिक व्हिडिओ लवकरच भेटीस, पाहा पहिली झलक

इमरान हाश्मीचा नवा म्युझिक व्हिडिओ लवकरच भेटीस, पाहा पहिली झलक

Subscribe

बॉलिवूडचा अभिनेता इमरान हाश्मीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. गेल्या २० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेला इमरान हाश्मीच्या नव्या म्युझिक व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. इमरान हाश्मीने आज या नव्या म्युझिक व्हिडिओबाबत पोस्ट शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. इमरानच्या ही पोस्ट पाहून चाहते उत्सुक झाले आहेत.

इमरान हाश्मी या नव्या म्युझिक व्हिडिओमध्ये सहर बाम्बासोबत रोमांस करताना दिसणार आहे. त्यामुळे ही नवीन रोमँटिक जोडी पाहण्यासाठीही चाहते उत्सुक झाले आहेत. ‘इश्क नही करते’ असे या म्युझिक व्हिडिओचे नाव आहे. निर्मात्यांनी या म्युझिक व्हिडिओचा पहिला पोस्टर रिलीज करून गाण्याचा टीझर केव्हा येणार आहे याबाबत खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

- Advertisement -

या नव्या म्युझिक व्हिडिओतून इमरान हाश्मी, गायक बी प्राक आणि सहर बम्बानी हे त्रिकुटाची जुगलबंदी लवकरच कमाल करणार आहे. गाणे रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहे. कारण यापूर्वीचे इमरान हाश्मीचे म्युझिक व्हिडिओने धुमाकूळ घातला होता.

- Advertisement -

दरम्यान बी प्राकने आपल्या दमदार आवाजाने खूप लोकप्रियता मिळवली आहे. बी प्राकची प्रत्येक गाणी हिट झाली आहेत. तसेच इमरान हाश्मी आपल्या रोमँटिक अंदाजामुळे लोकप्रिय आहे. इमरान हाश्मीच्या जन्मदिवसा निमित्ताने हा नवा म्युझिक व्हिडिओ रिलीज केला जाऊ शकतो.

इमरान हाश्मी म्हणाला की, ‘या गाण्यामुळे मी खूप उत्सुक आहे. चाहत्यांकडून मिळणारे प्रेम आणि प्रतिक्रियेमुळे मला खूप सकारात्मकता जाणवत आहे. मला हा म्युझिक व्हिडिओ माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक भेटवस्तू म्हणून चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे.’ इमरान हाश्मीचे हे नवे गाणे निर्माता राज जायस्वालने DRJ रेकॉर्ड्सच्या आपल्या बॅनरखाली तयार केले आहे. हे गाणे जानी आणि बी प्राकने मिळून संगीतबद्ध केले आहे.


हेही वाचा – आता ‘Indias Got Talent’मध्ये शिल्पा शेट्टीची जागा घेणार मलायका अरोरा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -