बॉलिवूडची चुणचुणीत अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती कायम विविध पोस्टच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. काही महिन्यांपूर्वी तिने केदारनाथ दर्शन केले होते आणि यावेळी तिच्यासोबत एका अभिनेत्याला स्पॉट करण्यात आले होते. हा अभिनेता म्हणजे अर्जुन प्रताप बाजवा. तेव्हापासून सोशल मीडियावर अर्जुन आणि साराच्या डेटिंग शेटींगबद्दल बोललं जातंय. बऱ्याचदा ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील म्हटले गेले आहे. यावर अखेर आता अर्जुनने मौन सोडले आहे.
सारा- अर्जुनच्या डेटिंगची निव्वळ अफवा?
सारा अली खान ही बॉलिवूडची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे. जो तिच्याविषयी जाणून घेण्यात कायम रुची ठेवतो. आतापर्यंत सारा अली खानचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात सारा आणि नवोदित अभिनेता अर्जुन प्रताप बाजवा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी चांगलाच जोर धरल्याचे दिसले. मुख्य म्हणजे इतकं बोललं जात असताना दोघांनीही यावर बोलणे टाळल्याने अफवांनी आणखीच वेग धरला. अखेर आता या चर्चांविषयी अर्जुनने स्पष्ट वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला अर्जुन बाजवा?
एका मुलाखतीत अभिनेता अर्जुन प्रताप बाजवाला सारा अली खानसोबत असलेल्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने न टाळता उत्तर देणे स्वीकारले आणि या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. अर्जुन म्हणाला, ‘मला माझ्या प्रोफेशनल करिअरवर या सर्व अफवांचे ओझे नको आहे. हे सगळं बकवास आहे. लोकांना जे लिहायचे आहे, ते त्यांनी लिहावे. हेच त्यांचे काम आहे. जे त्यांनी नक्कीच करावं. मी फक्त माझ्या स्वतःवर लक्ष देतो आहे आणि काय करायचं आहे, त्यावर लक्ष देतोय. त्यामुळे मला कोणताही मनस्ताप होत नाही’.
कोण आहे हा अर्जुन प्रताप बाजवा?
अभिनेता अर्जुन प्रताप बाजवा हा राजकीय क्षेत्रातील नामांकित नेते फतेह सिंह बाजवा यांचा मुलगा आहे. त्यामुळे अर्जुनचा बॅकग्राउंड हा राजकीय आहे. मात्र, राजकारणातून एक्झिट घेऊन त्याने मॉडेलिंग आणि ऍक्टिंगकडे आपला मोर्चा वळवला. ‘बॅड ऑफ महाराजा’ या सिनेमात तो झळकला होता. याशिवाय त्याने ‘सिंग इज ब्लिंग’साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. इतकंच नव्हे तर तो एक MMA फायटरसुद्धा आहे.
हेही पाहा –