घरमनोरंजनअक्षय, अजय देवगनसह अनेक कलाकार करणार ओटीटी प्लॅटफॉमवर एंट्री

अक्षय, अजय देवगनसह अनेक कलाकार करणार ओटीटी प्लॅटफॉमवर एंट्री

Subscribe

लिवु़ड खिलाडी अक्षय कुमार देखिल त्याचा नवा अवतार घेऊन वेब सिरीजमध्ये पदार्पण करणार आहे.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसची लाट येऊन जवळ-जवळ वर्ष पालटले असले तरी कोरोनाचा कहर अद्याप कायम आहे. अशातच सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सरकारच्या नियमांअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही कामास बाहेर पडण्यास निर्बंध आखण्यात आले होते. याचा खुप मोठा फटका संपुर्ण चित्रपटसृष्टीला देखिल पडला. आणि याचदरम्यान लोकांची पाऊले मनोरंजनासाठी ओटीटी कडे वळली. ओटीटी माध्यामांवर अनेक वेबसिरीज भाव खाऊन गेल्या 8-10 भागांच्या प्रत्येक वेबसिरिज प्रेक्षकांची ऊत्कंटा वाढवणारी ठरतेय. इतकेच नाही तर मोठ्या पडद्याचा सुरु होण्याची वाट बघता-बघता अनेक बिग बजेट सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ लागला. ओटीटी माध्यमांचे वाढते महत्व पाहता अनेक स्टार आता वेब सिरीजच्या अंतर्गत डिजीटल डेब्यू करण्यास सज्ज झाली आहेत. आगामी काळात अनेत सुपरस्टार ओटीटीवर आपला जलवा दाखवण्यास तयार झाली आहेत. सध्या नुकतच रिलीज झालेली द फॉमिली मॅनच्या भरघोश यशानंतर बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये आता वेब सिरजचा दबदबा वाढू लागला आहे. अभिनेता अक्षय कुमार,अजय देवगन,शाहिद कपूर लवकरच वेब सिरीज मधून मनोरंजन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बॉलिवूड मधील अनेक बिगबजेट चित्रपटांना टक्कर देणार्‍या वेब सिरिज दिवसेंदिवस भाव खाऊन जात आहेत. सध्या सिनेमागृह बंद असल्यामुळे वेबसिरिजचा जमाना आहे असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. अनेक बडे कलाकार आता वेब सिरिजमध्ये झळकणार असल्याचे दिसत आहे. लवकरच अभिनेत्री माधुरी दीक्षित नेटफ्लिक्सच्या ‘फइंडिंग अनामिका’ वेब सिरिज मध्ये दिसणार आहे. तसेच माधुरीची पहिली वहिली वेब सिरिज असून तिच्यासोबत संजय कपूर मानव कौर यांची वर्णी लागली आहे. नुकतच नेटफ्लिक्सच्या ‘फइंडिंग अनामिका’ वेब सिरिजचा पोस्टर शेअर केलं आहे. याचप्रमाणे
गेल्या काही दिवसात वाढत चाललेल्या ओटीटी प्लॅटफॉमचा प्रभाव पाहता बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण सुद्धा ओटीटी वर दमदार एंट्री करणार आहे. ‘लुथर’ या ब्रिटिश वेब सिरिजच्या अधिकृत रिमेक द्वारे तसेच अजय देवगन ‘रुद्रा’ या वेब सिरिजमध्ये काम करणार आहे. तसेच ही सिरिज एक सायकोलॉजिकल ड्रामा असून हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज केली जाणार आहे. बॉलिवु़ड खिलाडी अक्षय कुमार देखिल त्याचा नवा अवतार घेऊन वेब सिरीजमध्ये पदार्पण करणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा –सायली संजीववर चढला हळदीचा रंग

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -