घरमनोरंजनEsha Deol Divorce : 'दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर...ईशाच्या 'त्या' पुस्तकातून माहिती समोर!

Esha Deol Divorce : ‘दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर…ईशाच्या ‘त्या’ पुस्तकातून माहिती समोर!

Subscribe

अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ईशा तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे. तिच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. ईशा आणि भरत यांच्याकडे चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं कपल म्हणून पाहिलं जात होतं. अनेक दिवसांपासून ईशा आणि तिचा नवरा भरत तख्तानी यांच्यात काही ठीक चालत नसून दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता दोघांनीही अखेर वैवाहिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. आता त्यांनी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.

दिल्ली टाइम्सने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये या जोडप्याने त्यांच्या संयुक्त निवेदनात, 11 वर्षांच्या संसारानंतर परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी आमची मुलं महत्वाची आहेत. त्यांच्या आनंदाचा आणि हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. असं म्हणत दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. यात आता सोशल मीडियावर त्यांच्यात नेमक्या कोणत्या कारणामुळे घटस्फोट झाला याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

त्यात आता ईशाच्या 2020 मध्ये आलेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला जात आहे. त्यामध्ये ईशा असं सांगते आहे की, माझ्याकडून भरतच्याबाबत अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. जेव्हा आम्हाला दुसरी मुलगी झाली तेव्हापासून आमच्यातील वाद वाढत होते. ईशाच्या ‘अम्मा मिया’ नावाच्या पुस्तकात ईशानं वैवाहिक नात्यावर भाष्य केलं आहे.  ती म्हणते, दुसरी मुलगी झाली आणि भरत माझ्यापासून दुरावला गेला. आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हतो.

मला माझ्या अनेक प्रोजेक्टमुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ऑफिसची कामं, वेगवेगळे असाईनमेंटस, त्यात माझ्या नव्या पुस्तकाचे लेखन या कारणामुळे भरतला वेळ देणं शक्य नव्हते. कोणत्याही पतीला असे दुर्लक्षित केल्यावर वाईट वाटणं साहजिकच आहे.

- Advertisement -

राध्या आणि मिराया यांची शाळा, त्यांच्याकडे द्यावे लागणारे लक्ष आणि त्यात माझ्या मिटिंग्ज यामुळे माझ्या आणि भरतच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. या गोष्टी भरतनं नोटीस केल्या होत्या. मलाही माझे काही चुकते आहे हे निदर्शनास आले होते. असे ईशानं त्या पुस्तकात म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

 ईशा देओलनं 29 जून 2012 रोजी भरतशी लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणानं पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडप्यानं राध्या नावाच्या मुलीला जन्म दिला त्यानंतर 2019 मध्ये ईशानं त्यांची दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत आणि दोघांना दोन मुली आहेत. आता मात्र 11 वर्षानंतर दोघांचा संसार मोडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -