घरमनोरंजनEsha Deol Divorce :'घरात शॉर्ट्स घालणं म्हणजे'… ईशा देओलने मांडली व्यथा

Esha Deol Divorce :’घरात शॉर्ट्स घालणं म्हणजे’… ईशा देओलने मांडली व्यथा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. ईशा आणि भरत कॅालेजपासून एकमेकांसोबत होते. 2012 साली त्यांनी लग्न केलं होतं. 12 वर्षाच्या सुखीसंसारानंतर ईशा आणि भरत यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ईशानं तिनं लिहिलेल्या पुस्तकात लग्नानंतर तिचं आयुष्य कसं बदललं याविषयी देखील लिहिलं आहे. तिच्या घटस्फोटानंतर पुस्तकातील अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत.

पुस्तकाच्या माध्यमातून मोठा खुलासा
2020 साली ईशाचं ‘अम्मा मिया’ हे पुस्तक प्रकाशित झालं होतं लग्नानंतर आपण जास्तच मॅच्योर झाल्याचं ईशाने सांगितल. या पुस्तकात ईशा देओलनं लिहिलं की, 2012 मध्ये आमचं लग्न झालं, त्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. लग्नानंतर मी मच्युअर आणि जबाबदार झाले होते. मला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी बदलाव्या लागल्या. जेव्हा मी भरतच्या कुटुंबासोबत राहू लागली तेव्हा मी शॉर्ट्स आणि टी-शर्टवर फिरू शकत नव्हते. जसं मी लग्नाच्या आधी घरात फिरायचे. मला माझ्या जीवनशैलीत बदल करावा लागला. पण हेही खर आहे की या कुंटुंबाने लगेच मला आत्मसात केलं.

- Advertisement -

पुढे ईशानं सांगितलं की, “तख्तानी कुटुंबातील सगळ्या महिला या त्यांच्या नवऱ्यासाठी जेवणाचा डब्बा बनवून देत होत्या. भरतला भेटायच्या आधी मला स्वयंपाकतील काहीच येत नव्हत. पण मला माझ्या सासुने कधीच किचनमध्ये येण्यासाठी फोर्स केलं नाही. याबाबतीत सासूची आभारी नक्कीच आहे .त्यांनी कधीच मला कोणत्या रुढी-परंपरां पाळण्यासाठी फोर्स केलं नाही. जे एका सुनेकडून अपेक्षित असतं. मी घरातील पहिली सून असल्याने माझे लाडही झाले. मला नेहमी चॅाकलेट, ब्राऊनी, फळं दिले जायचे.”

ईशा – भरत यांचं संपलं नातं
‘दिल्ली टाइम्स’नं दिलेल्या रिपोर्टनुसार, ईशा आणि भरतनं एक जॉइन्ट स्टेटमेंट त्यांच्या घटस्फोटाविषयी घोषित केलं. स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहिलं की ‘आम्ही दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर, आता आम्ही एकत्र नाही. मात्र, आमच्यासाठी आमच्या दोन्ही मुलाचं भविष्य खूप महत्त्वाचं आहे आणि कायम राहिल. आशा आहे की तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल.’

- Advertisement -

ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर ईशा देओल हिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये ईशा हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री दोन मुलींसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -