घरमनोरंजननैतिकता, महत्त्वाकांक्षेतील संघर्षांचा 'चुंबक' प्रदर्शनासाठी सज्ज

नैतिकता, महत्त्वाकांक्षेतील संघर्षांचा ‘चुंबक’ प्रदर्शनासाठी सज्ज

Subscribe

नैतिकता व महत्त्वाकांक्षा यामधून एकाची निवड करण्‍याच्‍या सातत्‍यपूर्ण संघर्षाबाबतची कथा घेऊन येत आहे म‍राठी चित्रपट ‘चुंबक’. राष्‍ट्रीय पुरस्‍कार-विजेते दिग्‍दर्शक संदीप मोदी यांचे दिग्‍दर्शन आणि अक्षय कुमार प्रस्‍तुत चित्रपट ‘चुंबक’मध्‍ये साहिल जाधव, स्‍वानंद किरकिरे आणि संगम देसाई प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ नोव्‍हेंबर २०२१ रोजी सो‍नीलिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

‘चुंबक’ ही किशोरवयीन रेस्‍टॉरण्‍ट कामगार बाळू याची आधुनिक काळातील कथा आहे. तो त्‍याचे स्‍वप्‍न साकारण्‍यासाठी लोकांची फसवणूक करण्‍याचे ठरवतो. त्‍याचा एकमेव बळी ठरलेले प्रसन्‍न (स्‍वानंद किरकिरे) यांच्‍याशी सामना होतो. प्रसन्‍न हे बौद्धिक अक्षमता असलेले वृद्ध आहेत. त्‍यानंतर बाळू नैतिकता व स्‍वप्‍नांच्‍या दुविधेमध्‍ये अडकून जातो. दोघेही एका प्रवासावर निघून जातात, जो त्‍यांच्‍या जीवनाला कायमस्‍वरूपी कलाटणी देतो. बाळू त्‍याच्‍या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्‍यासाठी निरागस व्‍यक्‍तीची फसवणूक करेल का की त्‍याचे मन बदलेल? अशी कथा या चित्रपटातून उलघडत जाणार आहे.

- Advertisement -

कायरा कुमार क्रिएशन्‍सचे नरेन कुमार निर्मित ‘चुंबक’ हा केप ऑफ गुड फिल्‍म्‍स प्रॉडक्‍शनचा चित्रपट आहे. नैतिकता व महत्त्वाकांक्षांमधील संघर्षाबाबतचा हा हृदयस्‍पर्शी ड्रामा १२ नोव्‍हेंबर २०२१ पासून सोनीलिव्‍हवर पाहता येणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -