50 वर्षांनंतर सुद्धा हिट आहे धर्मेंद्र आणि मुमताजची जोडी; पाहा व्हिडीओ

"जुनं ते सोनं" असे आपण नेहमी बोलत असतो. अशाच प्रकारे बाॅलिवूडमध्ये देखील स्क्रीनवरील अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांना आजही लोकांचे प्रेम मिळत आहे. अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री मुमताज ही बॉलिवूडमधील अशीच एक जोडी आहे, ज्या जोडीने ६० ते ७० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण आजही ५० वर्षांनंतर त्यांची ही जादू कायम आहे. नुकतेच या जोडीने सोनी वाहिनीवरील 'इंडियन आयडल' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Even after 50 years, the duo of Dharmendra and Mumtaz is a hit

ृज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि मुमताज यांची जोडी वर्षानुवर्षे जुनी आहे. 60 ते 70 च्या दशकात या जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. लोफर ते झील के उल पार यांसारख्या हिट चित्रपटात एकत्र काम केलेल्या धर्मेंद्र आणि मुमताजला पाहण्यासाठी अनेक वर्षांपासून चाहते आतुर झाले होते. पण अलीकडेच इंडियन आयडल 13 या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये दोघांच्या येण्याने चाहत्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. या शोमध्ये दोघांचा 50 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ प्रेक्षकांना दाखवण्यात आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांची प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवले नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंडियन आयडलच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये धर्मेंद्र आणि मुमताज यांनी “मैं तेरे इश्क मे मर ना जाऊ कही” या गाण्यावर अभिनय केला. जो व्हिडीओ आता सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून व्हायरल करण्यात येत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तसेच अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट करत आपले मत व्यक्त करत आहेत. तर एका चाहत्याने त्यांचा आताच हा व्हिडीओ आणि त्यांच्या या गाण्याचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या जोडीला एकत्र पाहता आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by status.Point075 (@status.point075)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून एका चाहत्याने लिहिले की, “दोघेही भारतीय सिनेमाचे सुपरहिरो आहेत.” दरम्यान, इंडियन आयडलच्या या एपिसोडला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या एपिसोडमध्ये एन्ट्री करताना धर्मेंद्र आणि मुमताज हातात हात घालून सेटवर दाखल झाले होते. या हिट जोडीने 1960 ते 1975 च्या दशकात काजल, मेरे हमदम मेरे दोस्त, झील के उस पर, आदमी और इंसान आणि चंदन का पालना यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यांच्या चित्रपटांची अशी अनेक गाणी आहेत जी ऐकताना आजही प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांचा वैयक्तिक डाटा विकला जातोय? वाचा नेमके प्रकरण काय?

गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री मुमताज ही सगळ्यापासून लांब होती. ज्यामुळे ती खरंच या जिवंत आहे की नाही यांवर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत होत्या. पण मुमताज गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. मागील काळात तिने कँसरसारख्या आजाराला तोंड दिले आहे. ती अगदी व्यवस्थित आहे, हे तिच्या चाहत्यांना सांगण्यासाठी ती या कार्यक्रमाला उपस्थित राहिली, असे मुमताजने या कार्यक्रमामध्ये सांगितले.