वयाच्या 75 व्या वर्षी देखील मुमताज करतायत जबरदस्त वर्कआऊट; व्हिडीओ व्हायरल

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी एकेकाळी संपूर्ण बॉलिवूड गाजवले होते. त्यांच्या सौंदर्याचे त्याकाळी अनेक चाहते होते. आजही वयाच्या 75 व्या वर्षी देखील मुमताज तितक्याच सुंदर दिसतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुमताज यांनी आपले इंस्टाग्राम अकाऊंट सुरु केले आहे. नव्या अकाऊंटवर मुमताज यांनी त्यांचे वर्कआऊटचे काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. त्यांचे हे व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

मुमताज यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी पाहून अनेक त्यांचे कौतुक करत आहेत. मुमताज यांचे फिटनेस प्रेम पाहून चाहते प्रभावित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumtaz Actress (@mumtaztheactress)

वयाच्या 75 व्या वर्षी मुमताज यांचे हे फिटनेस प्रेम पाहून चाहत्यांना खूप प्रेरणा मिळत आहे. त्याच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘आणि इथे आम्ही काहीही करत बसलो नाही, फक्त इंस्टाग्राम पाहत आहोत आणि पाय हलवत आहोत’. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘कृपया स्वत:ची काळजी घ्या, तुम्ही अप्रतिम आहात मॅडम.’ याशिवाय त्याच्या समर्पणाचे कौतुक करताना अनेक चाहते त्याच्याकडून प्रेरणा घेत आहेत. त्‍याच्‍या वर्कआउट सेशन्‍सने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.

OTT वर पदार्पण करणार मुमताज

मुमताज यांनी 1958 मध्ये ‘सोने की चिडिया’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मुमताज त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. मुमताज यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले, आता त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुमताज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरा मंडी’ मध्ये दिसणार आहे.


हेही वाचा :

कपिलच्या शोमध्ये जाऊन काय मिळालं?… फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षय कुमारवर संतापले थिएटर मालक