बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रनौत सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. कंगना अनेकदा सोशल मीडियावरुन बॉलिवूड कलाकार आणि बॉलिवूड चित्रपटांविरोधात भाष्य करताना दिसते. दरम्यान, आता कंगना रनौतने अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. यासंबंधीत कंगनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, कंगना रनौतचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या व्हिडिओमध्ये कंगना रनौत शाहरुखच्या चित्रपटाचं चक्क कौतुक करताना दिसत आहे.
कंगनाने केलं शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाचं कौतुक
View this post on Instagram
शाहरुख खानचा ‘ पठाण ‘ हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केला. अनेकांना या चित्रपटाची आणि चित्रपटातील गाण्यांची भुरळ पडली आहे. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने देखील या चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. काही माध्यमांशी संवाद साधताना पठाणबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने शाहरुख खानच्या चित्रपटाचे कौतुक केले. यावेळी कंगना राणौत म्हणाली की, “पठाण चित्रपट खूप चांगला चालला आहे.” याशिवाय या व्हिडीओत कंगनाच्या शेजारी उभे असलेले अनुपम खेर यांनीही पठाण चित्रपटाचे कौतुक केले आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये असलेल्या इतर कलाकारांनी देखील शाहरुखच्या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.
हेही वाचा :