बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या प्रदर्शित झालेल्या शमशेरा चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. या चित्रपटाचं ओपनिंग डे कलेक्शन १०.२५ कोटी कमावले होते. चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये ३१ कोटींची कमाई केली. मात्र, प्रदर्शनापूर्वी बहपुचर्चित असलेल्या या चित्रपचटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. प्रेक्षकांकडून रणबीर कपूरच्या या चित्रपटाला फारशी पसंती मिळाली नाही.
शेमशेराच्या माध्यमातून चार वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर रणबीर कपूर पुन्हा चित्रपटामध्ये परतला आहे. मात्र या चित्रपटाने हवी तशी कमाई केली नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. ज्यानंतर दिग्दर्शक करण मल्होत्रा यांनी रणबीर कपूरचा बचाव करत ट्वीटर अकाऊंटवर #शमशेरा मेरी है असा हॅशटॅग दिलं होतं.
View this post on Instagram
आता या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणे अभिनेते संजय दत्त यांनी सुद्धा रणबीरचा बचाव करत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मोठ्ठं पत्र लिहिलं आहे. संजय दत्त यांनी लिहिलं की, “चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एक गोष्ट सांगण्याची मेहनत, त्या चित्रपटातील पत्रामध्ये पूर्णपणे तल्लीन होईन काम करने. ही सोप्पी गोष्ट नाही. हा चित्रपट रक्त, घाम आणि अश्रूंनी तयार झालेला चित्रपट आहे. हे एक स्वप्न आहे. जे आम्ही मोठ्या पडद्यावर घेऊन आलो आहोत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवले जातात. लोक चित्रपट पाहण्यापूर्वीच शमशेराचा तिरस्कार करत आहेत आणि काहीजण तर या चित्रपटाचा इतका तिरस्कार करत आहेत की त्यांनी चित्रपट पाहण्यापूर्वीच त्याला दर्जा दिला आहे.”