घरमनोरंजनकोजागिरी पौर्णिमेनिमित्त सदाबहार मराठी गाणी

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सदाबहार मराठी गाणी

Subscribe

कोजागिरी आणि चंद्राच एक वेगळ नात आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्र चांदण्यांवर लिहिलेली मराठीतील श्रवणीय सदाबहार गाणी खास तुमच्यासाठी.

हिंदू सणानुसार अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा येते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो.कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. या रात्री लक्ष्मी आणि इंद्र देवाची पुजा केली जाते.मध्यरात्री लक्ष्मी देवी भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’ असं विचारते. जो जागा असेल त्याला लक्ष्मी धन देते अशी कथा सांगितली जाते. पुजा झाल्यावर पोहे, नारळाचे पाणी यांचा प्रसाद दिला जातो. दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. दूधात चंद्र पाहून व्रताची सांगता केली जाते. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे दूध आरोग्यदायी आहे.या रा्त्री जागरण केले जाते. भगवान श्रीकृष्णांनी या रात्री रासलीला केली होती. त्यामुळे कोजागिरीच्या रात्री टिपऱ्याचा नाच केला जातो. कोजागिरी पौर्णिमेला गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. दारात रांगोळ्या काढल्या जातात.

कोजागिरी आणि चंद्राच एक वेगळ नात आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्र चांदण्यांवर लिहिलेली मराठीतील श्रवणीय सदाबहार गाणी खास तुमच्यासाठी.

- Advertisement -

उगवला चंद्र पूनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा!
मम ह्रदयी दरिया! उसळला प्रीतीचा!

पाणीग्रहण नाटकातील बकुळ पंडित यांनी गायलेलं हे नाट्यगीत. प्र.के. अत्रे यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.

- Advertisement -

हे सुरांनो चंद्र व्हा
हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्यांचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा
ययाती देवयानी या चित्रपटासाठी कुसुमाग्रजांनी लिहिलेले आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच आवाजातील हे गाणं.

पुनवेचा चंद्र आला

पुनवेचा चंद्र आला घरी
चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुऱ्यात
खाऱ्याखाऱ्या वाऱ्यात
तुझा माझा एकान्त रे, साजणा!

१९६८ मध्ये मंगळसूत्र या सिनेमासाठी शांता शेळके यांनी लिहिलेले आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरातील हे गाणं

चंद्र आहे साक्षीला

पान जागे फूल जागे भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षिला,चंद्र आहे साक्षिला!
आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदिश खेबूडकर यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे श्रवणीय गीत.

शुक्रतारा
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

यमनकल्याण रागातलं अरूण दाते आणि सुधा मलहोत्रा यांच्या स्वरातील शुक्रतारा हे गाणं. मंगेश पाडगावकरांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.या गाण्याला ५० हूर अधिक वर्षे झाली आहेत. तरी आजही तरूण पिढीतही हे गाण तितकेच लोकप्रिय आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -