आयुष्मान खुरानाच्या ‘अनेक’ चित्रपटाचे धमाकेदार ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ‘अनेक’ या नव्या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. त्याच्या हा चित्रपट गेल्या अनेक दिवसात चर्चेत आहे. ‘अनेक’ चित्रपटातून पहिल्यांदाच आयुष्मानचा अनोखा अंदाज दिसून येत आहे. या चित्रपटात तो अंडरकवर एजंटची भूमिका साकारत आहे. इतकंच नव्हे तर अभिनव सिन्हा यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘अनेक’ चित्रपटाची कथा देखील वेगळी पाहायला मिळणार आहे.

ट्रेलर पाहून असं लक्षात येतंय की, या चित्रपटात भारताच्या नॉर्थ ईस्ट भागातील गुन्हेगारी आणि राजकारण दाखवण्यात आले आहे. अनेक चित्रपटाचा ट्रेलर आयुष्मान खुरानाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. आयुष्मान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे करोडो चाहते आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Benaras (@benarasmediaworks)

आयुष्यामानचा हा चित्रपट येत्या २७ मे रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये भारताच्या नॉर्थ ईस्ट भागातील लोकांच्या समस्या  दाखवण्यात आल्या आहेत. अनेक चित्रपटाचे ट्रेलर शेअर करत आयुष्मानने त्याखाली एक खास कॅप्शन सुद्धा लिहिला आहे. त्यात त्याने लिहिलंय की, ‘भाषा अनेक, संस्कृती अनेक, वेश अनेक….परंतु देश मात्र एक – जिंकणार कोण? हिंदुस्तान!’

या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आयुष्मानचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात आयुष्मान पहिल्यांदा एका अंडरकवर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

 

 


हेही वाचा :बाहुबलीच्या दिग्दर्शकांना धर्मवीर चित्रपटाची भुरळ ! चित्रपटाचे टिझर पाहून केलं कौतुक