२०२४ वर्षात ज्याने दुहेरी भूमिका साकारून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं असा अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी पुन्हा एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ! “जिलबी ” गोड ही.. गूढ ही ” अशी कल्पक टॅगलाईन असलेला हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळा असणार यात शंका नाही.
स्वप्नीलने सोशल मीडिया वर पोस्ट करून त्याचा नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच रहस्याचा थरार घेऊन येणारा जिलबी चित्रपट नक्की काय असणार या बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये स्वप्नील खूप जास्त वेगळ्या लूक मध्ये दिसतोय आणि या नव्या लूक ची जोरदार चर्चा देखील होताना दिसतेय.
जिलबी मधल्या भूमिके बद्दल बोलताना स्वप्नील सांगतो ” गेली काही वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतोय की वेगळे चित्रपट आणि वेगळ्या गोष्टी असलेले चित्रपट करावे कारण मला स्वतःला वेगळ्या गोष्टी बघण आणि करण यात मज्जा येते कधीतरी हे वेगळेपण यशस्वी ठरत कधी ठरत नाही पण वेगवेगळ्या गोष्टी करण्यातल सातत्य मी जपतोय याचा आनंद आहे. अश्या प्रयोगशील भूमिकांमधून वाळवी असेल किंवा आता जिलबी असे चित्रपट घडतात म्हणून काम करताना देखील तितकीच मज्जा येते. जिलबी बद्दल सांगायचं झालं तर हा एक थरार आहे नाट्य आहे कमालीचे कलाकार आहेत आणि कहाणी मध्ये ट्विस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. माझी भूमिका ही आधीच्या सगळ्या रोल पेक्षा नक्कीच खूप वेगळी आहे त्यामुळे मला देखील खूप उत्सुकता आहे. पोस्टरला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला असून ही एक अंडर कॉपची गोष्ट आता तुम्हाला सांगण्यासाठी सगळ्या भूमिकांना भेटवण्यासाठी आम्ही सगळेच खूप वाट बघतोय”
नवा लूक आणि नवा चित्रपट घेऊन स्वप्नील नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर आहे पण सोबतीने स्वप्नील ने या वर्षात बॅक टू बॅक वेगवेगळ्या विषयावर आधारित वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.
निर्मितीच्या सोबतीने अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सुपरस्टार स्वप्नील येणाऱ्या काळात अजून वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे !
हेही वाचा : Gautami Patil : गौतमी पाटीलचा अलका कुबल, सई अन् शिवसोबतचा व्हिडिओ व्हायरल
Edited By : Prachi Manjrekar