Faas : शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ‘फास’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

आपण जे करू शकलो नाही ते मुलांना बनवायचं आणि त्यांना खूप मोठं बनवायचं ही स्वप्नं प्रत्येक आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळत असली तरी शेतकरी मात्र याला अपवाद आहे. आजही जिथे शेतकऱ्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, आपल्या मुलांच्या मुलभूत गरजा भागवण्याची चिंता सतावते, तिथं त्यांच्या डोळ्यांत मोठं बनण्याची स्वप्नं कुठून येणार... याच वास्तवतेची जाणीव करून देणारा 'फास' हा मराठी चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Faas: Trailer of the movie 'Faas' which sheds light on the lives of farmers
Faas : शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या 'फास' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

आपण जे करू शकलो नाही ते मुलांना बनवायचं आणि त्यांना खूप मोठं बनवायचं ही स्वप्नं प्रत्येक आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळत असली तरी शेतकरी मात्र याला अपवाद आहे. आजही जिथे शेतकऱ्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, आपल्या मुलांच्या मुलभूत गरजा भागवण्याची चिंता सतावते, तिथं त्यांच्या डोळ्यांत मोठं बनण्याची स्वप्नं कुठून येणार… याच वास्तवतेची जाणीव करून देणारा ‘फास’ हा मराठी चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा मन हेलावून टाकणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ग्रामीण भागासोबतच शहरातील प्रेक्षकांचाही या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ची निर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी मिळून केली आहे. अविनाश कोलते यांनी ‘फास’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘फास’चा ट्रेलर रिलीज झाल्यावर लगेचच सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होऊ लागला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या ‘फास’च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला आकाशात वाऱ्याच्या वेगानं पळणारे ढग पहायला मिळतात. त्याला देण्यात आलेलं पार्श्वसंगीत मन हेलावून टाकतं. गावातील वस्ती, आत्महत्या करणारा जीव, मरण इतकं सोपं नसतं हे सांगणारा कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी, शेतकऱ्याच्या व्यथा, नैसर्गिक संकटं, शपथेची आठवण करून देणारा संवाद, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नं, त्यांची जगण्यासाठीची धडपड आणि अखेरीस अशीच परिस्थिती राहिली तर गावची स्मशानं होतील ही चेतावणी देणारा संवाद ‘फास’च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. धरतीच्या कुशीतून सोनं पिकवणारा शेतकरी गळ्याला का ‘फास’ लावून घेतो याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आल्याचं सांगणारा हा ट्रेलर आहे.

देश-विदेशातील अग्रगण्य सिनेमहोत्सवांमध्ये ‘फास’चं खूप कौतुक करण्यात आलं आहे. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘फास’ची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी केलं असून, दिग्दर्शनाच्या जोडीला अविनाश कोलते यांनीच पटकथालेखनाचं कामही केलं आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमये या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. याखेरीज कमलेश सावंत शेतकऱ्याच्या, तर सयाजी शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत आहेत. यांना पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांची साथ लाभली आहे. डिओपी रमणी रंजन दास यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन संतोष समुद्रे यांचं आहे.


हेही वाचा – Bhuvan Bam Birthday : एकेकाळी रेस्टॉरंटमध्ये गाणारा भुवन आज ठरलाय भारतातील पहिला स्टार यूट्यूबर