Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Fact Check : अजय देवगणला मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्याचा खुलासा

Fact Check : अजय देवगणला मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्याचा खुलासा

Related Story

- Advertisement -

दिल्लीच्या रस्त्यावर काल मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणीमारी झाली. या हाणमारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यातच या व्हिडिओमध्ये मार खाणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या व्हिडिओतील मार खाणारी व्यक्ती अभिनेता अजय देवगणचं आहे का असा प्रश्न पडत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलनाला पाठींबा न दिल्याने अजय देवगणला काही लोक मारत आहेत. यावेळी अभिनेता अजय देवगण दारुच्या नशेत होता. या हाणामारीतील व्यक्तींचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. परंतु ज्या व्यक्तीला मारले जात होते तो व्यक्ती अजय देवगन सारखा दिसणारा आहे. त्यामुळे या व्हिडिओवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मारहाणीच्या व्हिडीओवर खुद्दा अभिनेता अजय देवगणने खुलासा केला आहे. अजय देवगणने या व्हिडिओवर खुलासा देत म्हटले आहे की, दिल्लीतील पबच्या बाहेर अजय देवगण मार खात असल्याचा दावा करत जो व्हिडियो व्हायरल होत आहे तो व्हिडिओ खोटा आहे. या व्हिडिओला घेऊन माझ्या संबंधित बातम्या प्रसारित करणाऱ्या वृत्तसंस्था आणि मीडियाला सांगू इच्छितो की, अजय देवगण पूर्ण वेळ मैदान, मेडे आणि गंगूबाई काठियावाडी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे गेल्या १४ महिन्यांपासून मी दिल्लीत पाय देखील ठेवला नाही. अजय देवगण जबाबदारनिष्ठ आणि सामाजिक भान ठेवून वागणारा व्यक्ती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनावट फेक आहे. त्यामुळे मीडियाला देखील विनंती आहे, बातम्या प्रसिद्ध करण्याआधी घटनेची पहिली माहिती करुन घ्यावी. असे म्हटले आहे. त्यामुळे या व्हिडिओत मार खाणारा व्यक्ती बॉलिवूड अभिनेता अजय देवगण नसल्याचे स्षष्ट झाले आहे.

- Advertisement -

तथापि, हा व्हिडीओ राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एअरोसिटी येथील आहे. रविवारी रात्री कार पार्किंगवरून दोन गटात भांडण झाले. नंतर या भांडणात हाणामारी सुरु झाली. या हाणामारीत बरीच लोकं सामील झाली होती. त्यांनी एका व्यक्तीला पकडून चांगलीच मारहाण केली. पण या घटनेचा अजय देवगणशी काही संबंध नसल्याचं आता स्पष्ट झाले आहे.


 

- Advertisement -