Instagram वर दीपिका- प्रियांकाचे फेक फॉलोअर्स, पोलीस करणार चौकशी!

फेक फॉलोअर्स संदंर्भात भारतामध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच चौकशी केली जात आहे.

fake followers

सेलेब्रेटींमध्ये सोशल मीडियावर कोणाचे किती फॉलोअर्स आहेत याला फार महत्त्व आहे. या फॉलोअर्सच्या संख्येवरून त्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेक सेलेब्रेटी काळाबाजार करत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कारण अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ही खूप महत्वाची वाटते. जितके अधिक फॉलोअर्स तितकी जास्त किंमत असं गणित या डिजीटल जगातील लोकप्रियतेसाठी मांडलं जातं. मात्र आता खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

View this post on Instagram

#happysunday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

यासाठी पोलिसांनी १० जणांची यादी तयार केली आहे. या यादीतील सर्वात महत्त्वाची दोन नावं म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच या दोन्ही अभिनेत्रींची चौकशी करणार आहे. इंस्टाग्रामच्या भाषेत फेक फॉलोअर्सला बोट्स असं म्हणतात. याच ‘बोट्स’च्या मदतीने अनेक कलाकार आणि प्रभावशाली व्यक्ती आपल्या फॉलोअर्सची संख्या फुगवून दाखवतात. हे बोट्स विकत घेतलेले असतात. म्हणजेच पैसे देऊन फॉलोअर्सची संख्या वाढवता येते.

View this post on Instagram

Expectation vs. Reality 📸- @divya_jyoti

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

आता ही गोष्ट समोर आल्यानंतर चौकशीचा भाग म्हणून मुंबई पोलीस लवकरच अभिने प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार आहेत.  त्यानंतर येत्या काही आठवड्यांमध्ये मुंबई पोलिसांचे विशेष पथक या अभिनेत्रींबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याच समजत आहे. खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील या तपासादरम्यान दीडशे लोकांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रिटींबरोबरच अनेक खेळाडू, बिल्डर आणि हाय प्रोफाइल व्यक्तींची नावं असल्याचं सांगण्यात येत आहे. फेक फॉलोअर्स संदंर्भात भारतामध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच चौकशी केली जात आहे.

या फेक फॉलोअर प्रकरणात आतापर्यंत १८ लोकांची चौकशी झाली आहे. पोलिसांनी या व्यक्तींची चौकशी केली आहे ते सर्वजण हे छोट्या पडद्याशी म्हणजेच मालिका आणि टीव्हीवरील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत. यामध्ये कलाकारांबरोबरच निर्माते, निर्देशक, मेकअप आर्टीस्ट, कोरियोग्राफर आणि सहाय्यक दिग्दर्शकांचा समावेश आहे.


हे ही वाचा – गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्यूटी कलेक्टर!