Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन गश्मिर महाजनी आणि पूजा सावंत' चे प्रायव्हेट चॅट लीक, करताहेत डेटींग

गश्मिर महाजनी आणि पूजा सावंत’ चे प्रायव्हेट चॅट लीक, करताहेत डेटींग

Related Story

- Advertisement -

मराठी चित्रपटातील ग्लॅमरस चेहरा असलेली पूजा सावंत कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. अल्पवधीतच मराठी सिनेसृष्टीप्रमाणे बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची  पूजाने छाप पाडली आहे. यामुळे ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते. पण आता पूजाची वेगळ्याच विषयासाठी चर्चा होत आहे. पूजा आणि गश्मिर महाजनीच प्रायव्हेट डेटींग चॅट लिक झालं आहे.  यामुळे दोघांच नक्की काय चाललयं असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलाय. गश्मिर विवाहीत असूनही पूजाच्या प्रेमात पडलाय असंच ह्य़ा चॅटवरून दिसतय.

विशेष म्हणजे सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु असतानाच या दोघांमधील हे स्पेशल चॅट  आहे.  दरम्यान , पूजा आणि गश्मिर मधील हे चॅट पाहिल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.समोर आलेल्या मेसेजनुसार, उद्या (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे असल्यामुळे गश्मीर पूजासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार असल्याचं दिसून येत आहे. परंतु, खरचं या दोघांमध्ये काही खास नाते आहे का, की केवळ त्यांचा येणाऱ्या कोणत्या आगामी चित्रपट किंवा वेबसिरिस साठी ते असं करत आहेत हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे.

- Advertisement -