घरमनोरंजनबॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

Subscribe

बॅालिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. प्रदीप सरकार यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मागील अनेक काळापासून किडनीचा त्रास होता. शिवाय त्यांचे डायलिसिसही सुरू होते. गुरुवारी दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला. त्याच्या पोटॅशियमची पातळी खूपच कमी झाली होती. प्रकृती गंभीर झाल्याने रात्री तीनच्या सुमारास त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी पहाटे 3:30 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

प्रदीप सरकार यांच्या निधानाने त्यांचे कुटुंबीय, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेकजण त्यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण करत आहेत. आज दुपारी 4 वाजता प्रदीप सरकार यांच्यावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडतील.

- Advertisement -

प्रदीप सरकार यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी परिणीता, लागा चुनरी में दाग , मर्दांनी अश्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं होते. 2005 मध्ये विद्या बालन, संजय दत्त आणि सैफ अली खान यांच्या ‘परिणीता’ या चित्रपटाशिवाय ‘लफंगे परिंदे’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले तसेच काही वेब सिरीजचे दिग्दर्शनही केले.

अजय देवगणने केला शोक व्यक्त

- Advertisement -

यात त्याने लिहिलंय की, आमच्यातील काही लोकांसाठी प्रदीप सरकार, ‘दादा’च्या निधनाची बातमी पचवन खूप कठीण आहे. मी मनापासून शोक व्यक्त करतो. माझ्या प्रार्थना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. RIP दादा.” असं लिहिलं आहे.


हेही वाचा :

इरफान खानच्या मुलाने केला ‘पठाण’च्या गाण्यावर डान्स; शाहरुख म्हणाला…हा तुझ्यापेक्षा टॅलेंटेड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -