घरमनोरंजनसलमान खान आणि अमिताभ बच्चन यांना ब्रेक देणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृत्यू

सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांना ब्रेक देणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृत्यू

Subscribe

राकेश कुमार यांच्या निधनानंतर आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला अमिताभ बच्चन, जया बच्चनसह अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांचे अकाली एक्जिट होत आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माते राकेश कुमार यांचं निधन झालं. वयाच्या ८१ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा – टीव्ही जगताला हादरा; ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतील कलाकाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

- Advertisement -

दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. राकेश कुमार दीर्घकाळापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. अशा परिस्थितीत वयाच्या ८१ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील या दिग्दर्शकाने जगाचा निरोप घेतला आहे. राकेश कुमार यांच्या निधनानंतर आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला अमिताभ बच्चन, जया बच्चनसह अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली.

राकेश कुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक धमाकेदार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटांच्या यादीत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या मिस्टर नटरवाल, याराना, खून पसीना, दो और दो पांच, जॉनी आय लव्ह यू, कमांडर आणि सूर्यवंशी या चित्रपटांचा समावेश आहे. राकेश कुमार यांनी याराना आणि मिस्टर नटरवालच्या माध्यमातून बिग बींना फिल्म इंडस्ट्रीत एक खास ओळख मिळवून दिली. अमिताभ बच्चन यांच्याशिवाय राकेश कुमार यांनीही सूर्यवंशी चित्रपटात सुपरस्टार सलमान खानला ब्रेक दिला होता. मात्र, हा चित्रपट काही विशेष दाखवू शकला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान सानिया आणि शोएब ‘या’ कार्यक्रमात दिसणार एकत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -