Corona: सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज, शुक्रवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतरपासून ते कोरोनाच्या आजारावर उपचार घेत होते. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या बालसुब्रमण्यम यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खुपच खालावली होती. अखेर आज त्यांची आजाराशी झुंज संपली. कोरोनाने आणखी एक कलावंताचा बळी घेतला.

बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. हॉस्पिटलमधअये गेल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र आज सकाळपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होती. मात्र दुपारी त्यांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

बालसुब्रमण्यम त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत पार्श्वगायन केले आहे. हिंदी सिनेमांमधील त्यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहे. अभिनेता सलमान खान याला बालसुब्रमण्यम यांचा आवाज अगदी चपखल बसत होता. सलमान खानसाठी बालसुब्रमण्यम यांनी बहुतांश गाण्यांकरता पार्श्वगायन केले आहे.

हेही वाचा –

‘आधी हात जोडत होतो, आता दिल्लीच्या भिंती हलवून सोडू’; मोदींच्या अडचणी वाढणार?