घरमनोरंजनप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक कासिनाधुनी विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक कासिनाधुनी विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

Subscribe

दादासाहेब फाळके पुरस्काराने प्राप्त तेलुगू दिग्दर्शक कासिनाधुनी विश्वनाथ यांचे गुरुवारी (2 फेब्रुवारी) रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी हैदराबादमधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अवस्थ होती. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

2017 मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. तसेच 1992 मध्ये त्यांना पद्मश्री किताब देण्यात आला. जवळपास वीस वेळा आंध्र प्रदेश सरकारचा नंदी पुरस्कारही त्यांनी पटकावला, 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 10 फिल्मफेअर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यांना ‘कला तपस्वी’ म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांनी तेलुगू चित्रपटांच्या दिग्दर्शनासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील अनेक मोठ्या भूमिका पार पाडल्या आहेत.

- Advertisement -

के. विश्वनाथ यांचे हिंदी चित्रपट
तेलुगू चित्रपटांच्या दिग्दर्शनासोबतच हिंदीमध्ये त्यांनी ‘सरगम’, ‘कामचोर’, ‘शुभकामना’, ‘जाग उठा इन्सान’, ‘सूरसंगम’, ‘संजोग’, ‘ईश्वर’, ‘संगीत’, ‘धनवान’ या चित्रपटांचे दिग्दर्शिन केले.

 


हेही वाचा :

शुभमन गिल-सारामध्ये नेमकं काय चाललंय? 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -