घरक्राइमप्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने तब्बल 119 कोटी रुपयांची केली फसवणूक; गुन्हा दाखल

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने तब्बल 119 कोटी रुपयांची केली फसवणूक; गुन्हा दाखल

Subscribe

नवी दिल्ली : चित्रपट निर्माता जसप्रीत सिंग वालिया उर्फ ​​बंटी वालियावर यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आयडीबीआय बँकेला जयप्रीत सिंग याने केलेल्या फसवणुकीमुळे तब्बल 119 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले असल्यामुळे त्यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी रविवारी (28 मे) याप्ररकरणी माहिती दिली आहे. (A case has been registered in the case of fraud of Rs 119 crore by a famous film producer Jaspreet Singh Walia)

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्त, बिपाशा बसू अभिनीत ‘लम्हा’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी फिल्म फायनान्स स्कीम अंतर्गत जयप्रीत सिंग आणि इतरांच्या वैयक्तिक हमीवर दोन कर्ज घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आयडीबीआय बँकेने म्हटले की, कंपनी जीएस एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडला एका वित्त योजनेअंतर्गत 23.5 लाख डॉलरच्या विदेशी चलनाचे लोन आणि 4.95 कोटी रुपयांचे आरटीएल देण्यात आले.

- Advertisement -

बँकेने आरोप केला की ‘लम्हा’ चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु प्रवर्तक आणि प्रदर्शक यांच्यातील वादामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले. यानंतर 30 सप्टेंबर 2009 रोजी खाते नॉन परफॉर्मिंग ऍसेट (NPA) बनले. यानंतर बँकेने जीएसईपीएल, पीव्हीआर आणि खासगी बँक यांच्यातील त्रिपक्षीय करारांतर्गत चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यासाठी पीव्हिआरला एकमेव वितरक म्हणून नियुक्ती केली आणि पीव्हीआरपोस्ट-प्रॉडक्शन कामासाठी 8 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. परंतु पीव्हीआर कराराचे पालन करण्यात अपयशी ठरले. त्यांचे सुमारे 83.89 लाख रुपयांचे नुकसान झाले. कारण, कंपनीचे एकूण उत्पन्न केवळ 7.41 कोटी रुपये होते, तर कंपनीने जाहिरात आणि वितरणावर 8.25 कोटी रुपये खर्च केले होते.

बँकेने आरोप केला आहे की, फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झाले की कंपनीने फसवे प्रमाणपत्र सादर करून बँकेचा निधी वळवला आणि अकाउंट बूक्समध्ये फेरफार केला. त्यामुळे बँकेने जयप्रीत सिंग, जीएसईपीएल आणि इतरांची नावे गुन्हेगारी कट, फसवणूक आणि फसवणूक तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींशी संबंधित IPC कलमांतर्गत दिली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -