घरमनोरंजनप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी गायलं 'गाथा नवनाथांची' मालिकेचं शीर्षकगीत

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी गायलं ‘गाथा नवनाथांची’ मालिकेचं शीर्षकगीत

Subscribe

'गाथा नवनाथांची' आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत.

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी(Sony marathi) वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ (Gatha navnathanchi)ही मालिका २१ जूनपासून, सोम.-शनि., संध्या. ६:३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. या मालिकेत मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत जयेश शेवाळकर दिसणार आहे, तर अनिरुद्ध जोशी गोरक्षनाथांची भूमिका साकारणार आहे. नकुल घाणेकर आणि शंतनू गंगणे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

- Advertisement -

‘गाथा नवनाथांची’ आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रख्यात गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे. नवनाथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षगीतामुळेसुद्धा लोकांपर्यंत पोचणार आहे.


हे हि वाचा – ‘मराठी बिग बॉस 3’ चा नवा सिझन लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -