Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ होतोय व्हायरल, पोलिस निर्मात्याच्या शोधात

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ होतोय व्हायरल, पोलिस निर्मात्याच्या शोधात

रम्या सुरेश (Remya Suresh) हिचा एक मॉर्फ पॉर्न व्हिडीओ  सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (

Related Story

- Advertisement -

तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगति केली आहे. याचे जसे चांगले परिणाम आहे तितकाच वाईट प्रभाव देखील संपूर्ण मानवसृष्टीवर पडताना दिसत आहे. आज व्हिडीओ एडिटिंग, क्रोमा की, स्पेशल इफेक्ट यांसारख्या टूल्समुळं  तुम्ही जगाच्या कोणत्याही टोकाचे दृश्य दाखवून तिकडे असल्याचा भास निर्माण करू शकता. आणि हे अगदी सोप्पं आहे. सध्या हाईटेक टेक्नोलॉजीचे परिणाम एक प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री राम्या सुरेश भोगत आहे. रम्या सुरेश (Remya Suresh) हिचा एक मॉर्फ पॉर्न व्हिडीओ  सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Crime) या व्हिडीओ बद्दल माहिती मिळताच रम्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मार्फ व्हडिओ म्हणजे काय?

- Advertisement -

मार्फ म्हणजे एखाद्या फोटोवर किंवा व्हिडीओमधील व्यक्तीवर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा चेहरा एडिट करून लावणं. हा चेहरा लावल्यानंतर व्हिडिओ मधील व्यक्ति किंवा समोर दिसणार्‍या दृश्यामधील व्यक्ती तोच आहे की अन्य कोणी हे ओळखणं देखील कठीण जातं.

रम्याने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान म्हणाली आहे की,”हा व्हिडीओ पहिल्या नंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या एका मैत्रीणीनं मला या व्हिडीओबद्दल माहिती दिली होती. हा व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडावं अशी विनंती मी पोलिसांना केली आहे.” सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
सध्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चेर्‍याचा वापर करून पॉर्न व्हिडीओ तयार करण्यासाठी केला जात आहे. अभिनेत्री रम्या सुरेश सोबत देखील असाच प्रकार घडला आहे. या व्हिडीओ विरोधात तिनं सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या व्हिडीओची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.


- Advertisement -

हे हि वाचा – कार्तिक आर्यनच्या समर्थनार्थ दिग्दर्शक-निर्माता अनुभव सिन्हानी केलं ट्विट

- Advertisement -