घरमनोरंजनरंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांचे निधन

रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांचे निधन

Subscribe

अमित मिस्त्री यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

गुजराती सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अमित मिस्त्री यांचे निधन झाले आहे. आज २३ एप्रिल रोजी सकाळी ९:30 च्या दरम्यान या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. या अभिनेत्याच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अमित मिस्त्री मुंबईतील अंधेरी येथील जुहू गल्ली परिसरात त्यांच्या आईसोबत राहत होते. राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने अमित मिस्त्री यांची प्राणज्योत मालवली आहे. सिनेमा रेअरने ट्विट करत अमितयांच्या निधनाची बातमी दिली आहे.

 एका मुलाखतीत अमितने शिक्षणाबद्दल आणि कॉलेजबद्दल असताना केलेल्या अभिनयाबद्दल सांगितले होते. महाविद्यालयात असताना त्याने अनेक नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. या स्पर्धांदरम्यान बॉलिवूडमधील अनेक लोक परिक्षक म्हणून यायचे तेव्हाच अमितची अनेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर तो पृथ्वी थेटरमध्ये नाचक करायचा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Mistry (@actoramitmistry)

- Advertisement -

 अमित मिस्त्री यांनी ‘बे यार’ सारख्या गाजलेल्या गुजराती सिनेमांमध्ये काम केलं होतं. तसंत गुजराती रंगभूमीर त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. तसंच ‘क्या कहना’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ’99’, ‘शोर इन द सिटी’, ‘यमला पगला दीवाना’, ‘अ जेंटलमन’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अमितची बंदिश बॅंडिट्स ही वेब सिरिज काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या सिरिजमधील त्याच्या भूमिकेने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली होती.


हे वाचा- कोरोना लाभार्थ्यांवर येणार मराठी चित्रपट, ‘शंकर पाटील ऑन मॅट्रिक’चे पोस्टर लॉंच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -