Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन फेमस टिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या

फेमस टिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

फेमस टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर आपल्या आई वडीलांसोबत पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत राहत होता. त्याच्या आत्महत्येच्या बातमी साऱ्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या आत्महत्ये मागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी लोणीकंदन पोलीस ठाण्यात समीरच्या चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाडने तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच लोणीचंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समीरला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारांपूर्वीचे त्याने प्राण सोडले होते. डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले. समीरच्या आत्महत्येमागे नेमके कोणते कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु सोशल मिडियावर समीरचा लाखोंचा चाहता वर्ग होता. इंस्टाग्राम अकाउंटवर सध्या त्याचे १९ हजार आठशे फॉलोवर्स होते. तर फेसबुक आणि इतर सोशल मिडियावरही तो बराच एक्टिव्ह होता. शेतकऱ्यांसंदर्भात आणि एकंदरीत वास्तविक जीवनासंबंधीत भावनात्मक व्हिडिओ शेअर करायचा. समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.


हेही वाचा- Bigg Boss 14 Winner: रुबिना दिलैक बिग बॉस 14 च्या विजेते पदाची मानकरी

- Advertisement -

 

- Advertisement -