Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'फॅंड्री' फेम राजेश्वरी खरात हिला कोरोनाची लागण

‘फॅंड्री’ फेम राजेश्वरी खरात हिला कोरोनाची लागण

राजेश्वरीने तिचा कोरोना चाचणी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Related Story

- Advertisement -

फॅंड्री चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदापर्ण करणारी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात हिला कोरोनाची लागण झाली आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तिने यासंबंधीची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. राजेश्वरीने तिचा कोरोना चाचणी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे की, ”मित्रांनो नुकताच माझा कोव्हिड १९ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तरी जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्या सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबियांची चाचणी करुन घ्यावी, अशी विनंती. सध्या आवश्यक उपचार करत घेत मी क्वारंटाईन झाले आहे. आपल्या सर्वांचा आशिर्वाद आणि प्रार्थना सोबत असूद्यात. ” राजेश्वरीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा व्हिडिओ शेअर करत तिला स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

राजेश्वरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहत असते. राजेश्वरीचा चाहतावर्गही तसा मोठा आहे. तिच्या फोटो आणि व्हिडिओवर चाहत्याचा भरभरुन प्रतिसाद येतच असतो. काही दिवसांपूर्वी राजेश्वरीच्या पोस्टला येणाऱ्या भरघोस कमेंट्सवर एक मीम तयार केला गेला जो प्रचंड व्हायरल झाला होता.


- Advertisement -

हे वाचा-  ‘ससुराल सिमर का 2’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज, पहा मालिकेच्या लॉंन्च पार्टीचे फोटो

- Advertisement -