घरमनोरंजनराखीचा संसार मोडला? युजर्सच्या प्रश्नांना राखीने दिले 'हे' उत्तर

राखीचा संसार मोडला? युजर्सच्या प्रश्नांना राखीने दिले ‘हे’ उत्तर

Subscribe

राखीचा सुखी संसार सुरू झाला आहे असे वाटत असतांनाच तिचा संसार मोडलाय का? अशा चर्चाना आले उधाण

आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच युजर्सच्या चर्चेत आहे. राखी २८ जुलै रोजी लग्न बंधनात आडकली. राखीने नववधूच्या वेशभूषेतील सिंदूर आणि मंगळसू्त्र परिधान केलेले तिचा फोटो शेअर केला होता, मात्र तिच्या पतीचा फोटो तिने शेअर केला नव्हता त्यावेळी देखील तिला युजर्सच्या बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते.

राखीच्या लग्नाला १ महिना पुर्ण होत नाही तोपर्यंत राखीने दूसरा हनिमून देखील प्लॅन केला आहे. परंतु, राखीच्या पतीचा आतापर्यंत कोणताही पत्ता दिसत नाही. दरम्यान राखीने इंस्टाग्रामवर असे काही फोटो शेअर केले की, त्यामुळे सोशल मीडियावर युजर्सने लग्न मोडलं का? असाच थेट सवाल राखीला केला आहे. यावेळी राखीने खरंच लग्न केल आहे आणि तिचा सुखी संसार सुरू झाला आहे, असा विश्वास बसत असतानाच तिचा संसार मोडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

राखीने इंस्टाग्रामवर सलग असे तीन फोटो शेअर केले असून या फोटोत राखी नसून एक अ‍ॅनिमेटेड मुलीचा चेहरा असलेला फोटो आहे. त्यात ती रडताना दिसत आहे. राखीने शेअर केलेले हे फोटो पाहून सोशल मीडिया युजरने राखीला प्रश्न विचारून हैरान करून सोडले आहे.

- Advertisement -

अनेकांनी तिला ‘राखी, तुझे लग्न मोडले का?’ की ‘काय घटस्फोट झाला?’ असे विचारत हा चाललेला ड्रामा थांबवायला सांगितला आहे.

राखीनं अलीकडेच शेअर केलेल्या पोस्ट पाहून ती दु:खी असल्याचा अंदाज लावता येऊ शकतो. परंतु, तिने या पोस्टसोबत कोणाताही मजकूर लिहिला नसल्याने नेमके घडले आहे याचा मात्र अंदाज लावता येत नसल्याने युजर्सने राखीला प्रश्न विचारत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

दरम्यान, या साऱ्या प्रश्नांची सारी उत्तरं राखीने युजर्सना दिले आहे. एका मुलाखतीमध्ये खुद्द राखीने सांगितले की, लंडनमध्ये स्थायिक असणाऱ्या रितेश नावाच्या उद्योगपतीशी विवाहबंध झाल्याचे सांगितले. राखीने अलीकडेच एका एनआरआयशी कोणालाही न सांगता लग्न केले. यानंतर तिने लग्नाचे बातमी नाकारली परंतु नंतर राखीने त्याची कबुली दिली.

यासोबत सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या दुःखी फोटो मागचे कारण सांगताना ‘युकेचे तिकिट खूप महाग आहे, म्हणून रडतेय,’ असे तिने सांगितले. राखीचा पती हा युकेला राहतो. साहजिकच तिकिट महाग असल्याने ती युकेला जाऊ शकत नाही. हेच कारण आहे की म्हणून ती रडतेय. तसेच, तिचा पती लंडनला असतो, लग्न झाल्यानंतर तो लगेच लंडनला रवाना झाला, मात्र माझ्या व्हिसाचं काम अपूर्ण असल्यानं मी काही दिवसांनंतर त्यांच्याकडं जाणार आहे.’ असे तिने सांगतिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -