घरमनोरंजन'आशिकी 3'मध्ये कार्तिक आर्यनसोबत बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीला घेण्याची चाहत्यांची मागणी

‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीला घेण्याची चाहत्यांची मागणी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन येत्या काळात ‘आशिकी 3’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची सप्टेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती. कार्तिकच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू करणार आहेत. तर भूषण कुमार प्रोडक्शन कंपनी या चित्रपटाची टी-सीरीज प्रोड्यूस करेल. दरम्यान, अजूनही या चित्रपटाबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, याचं दरम्यान, कार्तिक आर्यन, अनुराग बसू आणि भूषण कुमार यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे असा अंदाज लावला जातोय की, यांच्यामध्ये नक्कीच ‘आशिकी 3’ चित्रपटाबाबत चर्चा झाली असेल.

कार्तिक आर्यन, अनुराग बसू आणि भूषण कुमार यांचा फोटो व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

कार्तिक आर्यन, अनुराग बसू आणि भूषण कुमार यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो पाहताच चाहत्यांनी या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरला घेण्याची मागणी केली आहे. अद्याप या चित्रपटात कोणती अभिनेत्री असणार आहे. हे अजून समोर आलेले नाही.

दरम्यान, 1990 मध्ये ‘आशिकी’ चित्रपटाचा पहिला सिक्वेल प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर 2013 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘आशिकी 2’ तयार करण्यात आला यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी प्रचंड पसंची दिली होती. तसेच या चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना भूरळ पाडली होती.

- Advertisement -

कार्तिक आर्यनचे आगामी चित्रपट
सध्या कार्तिक आर्यनचा फ्रेडी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. येत्या काळात त्याचा ‘शहजादा’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘आशिकी 3’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ मध्ये झळकणार आहे.

 


हेही वाचा :

सलमान खानने शेअर केला ‘किसी का भाई किसी की जान’मधील लूक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -