घरमनोरंजन'पठाण' OTT वर येताच प्राइम व्हिडिओचा सर्व्हर झाला क्रॅश

‘पठाण’ OTT वर येताच प्राइम व्हिडिओचा सर्व्हर झाला क्रॅश

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या ब्लॉक बस्टर ‘पठाण’ चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मेगा ब्लॉक बस्टर चित्रपट ठरला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हा चित्रपट OTT वर देखील प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात होतं. तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. काल रात्री हा OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच चाहते OTT वर तुटून पडले ज्यामुळे आता प्राइम व्हिडिओचा सर्व्हर काही काळासाठी क्रॅश झाला आहे.

‘पठाण’मुळे प्राइम व्हिडिओचा सर्व्हर क्रॅश

काल रात्री ‘पठाण’ OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच चाहते OTT वर तुटून पडले ज्यामुळे आता प्राइम व्हिडिओचा सर्व्हर काही काळासाठी क्रॅश झाला आहे. याबाबत शाहरुखच्या एका चाहत्याने मौसम बिघड गया असं म्हणत ट्वीट शेअर केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, OTT वर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पठाण’मधील काही सीन्स देखील काढून टाकण्यात आले आहेत. एका युजरने याबाबत एक ट्वीट शेअर करत माहिती दिली आहे.

‘पठाण’ने चित्रपटाने रचला इतिहास

‘पठाण’ चित्रपट भारतातील 800 आणि जगातील 20 देशांमधील 135 चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. या चित्रपटाने देशात जवळपास 549 कोटींची कमाई केली असून चित्रपटाने जगभरात 1049 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यातील बेशरम रंग या गाण्यावरून अनेक राज्यांमध्ये अनेक वाद रंगले होते.

- Advertisement -

दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तसेच या चित्रपटात सलमान खानचाही एक कॅमिओ देखील आहे.


हेही वाचा :

बॉलिवूडमधील ‘या’ हॉरर चित्रपटांना IMDB चे सर्वाधिक रेटिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -