ही भूतनी कोण आहे? कतरीना कैफच्या हॅलोवीन लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये सगळेच फेस्टिवल धुमधडाक्यात साजरे केले जातात आणि याची झलक आपल्याला सोशल मीडियावर पाहायला देखील मिळते. दरम्यान, नुकतीच बॉलिवूड कलाकारांची हॅलोवीन पार्टी पार पडली. त्यातील अनेक कलाकारांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी बॉलिवूड स्टारकिड्सचे हॅलोवीन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, आता अभिनेत्री कतरीना कैफने देखील हॅलोवीन पार्टीसाठी केलेला लूक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. कतरीनाचे हे फोटो पाहून तिचे चाहते अनेक कमेंट्स करु लागले आहेत.

कतरीना कैफने शेअर केला हॅलोवीन पार्टी लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरीना कैफ सध्या तिच्या ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटामूळे चर्चेत आहे. कतरीना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने हॅलोवीन पार्टीसाठी केलेला लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने हर्ले क्वीनचा लूक कॉपी केला आहे. कतरीनाने या लूकमध्ये डेमिन शॉर्टे्स सोबत गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे त्यावर तिने ट्रांसपरंट जॅकेट घातलं आहे. तसेच कतरीनाच्या केसांना लाल आणि निळ्या रंग लावून दोन वेण्या बांधल्या आहेत. तसेच तिच्या डोळ्यांना देखील लाल आणि निळ्या रंगाचा मेकअप करण्यात आला आहे.

कतरीना कैफच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर आता कतरीनाचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून कतरीनाचे चाहते यावर अनेक कमेंट्स करु लागले आहेत. यामध्ये एका युजरने कमेंट करत लिहिलंय की, “असं वाटतंय करंट लागला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “ही भूतनी कोण आहे?”

कतरीनाचे आगामी प्रोजेक्ट
कतरीनाचा येत्या 4 नोव्हेंबर रोजी ‘फोन भूत’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरीनासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त कतरीना सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच आलिया भट्ट आणि प्रियांका सोबत कतरीना ‘जी ले जरा’मध्ये देखील दिसणार आहे.


हेही वाचा :

मुखबिर ‘द स्टोरी ऑफ अ स्पाय’मधून उलगडणार भारताच्या इतिहासाची पानं, ट्रेलर रिलीज