उर्फी जावेदची बहीण चार पावले पुढे

मॉडेल उर्फी जावेद सोशल मीडियावर सतत तिच्या अनोख्या स्टाईलमुळे चर्चेत असचे. उर्फीने आत्तापर्यंत विविध पद्धतीचे अतरंगी ड्रेस परिधान करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. दरम्यान, आता उर्फीचा नाही तर तिच्या बहिणीचा एक बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फी प्रमाणेच तिची बहिण डॉली जावेद देखील तितकीच बोल्ड आणि स्टायलिश दिसत आहे.

उर्फीची बहिण डॉली जावेद तिच्या इतकीच बोल्ड आणि स्टायलिश आहे. डॉली देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच उर्फी जावेदचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिची धाकटी बहीण डॉली जावेदही तिच्यासोबत दिसत आहे. एकीकडे उर्फीच्या लूकची चर्चा आहे. त्याचवेळी डॉलीच्या कपड्यांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आहे. यावेळी डॉलीने फ्रंट कटआउट गाऊन घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, सध्या व्हायरल होत असेलेल्या उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत. या एकाने लिहिलंय की, “एक मुस्लिम असून अश्या गोष्टी करते, धोडी तर लाज ठेव.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हिच्या डिझायनरला ऑस्करमध्ये पाठवा”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “एका कपड्यात दोन्ही बहिणींनी दोन ड्रेस बनवले आहेत.” अश्या मजेशीर कमेंट्स उर्फी आणि तिच्या बहिणीच्या ड्रेसवर नेटकरी करत आहेत.

 


हेही वाचा :

मी थोडाफार विराटसारखा दिसतो… विराटच्या बायोपिकमध्ये काम करण्याची राम चरणची इच्छा