घरमनोरंजन'तारक मेहता का उल्ट चष्मा' फेम सोनूचा डांस पाहून चाहते झाले चकीत

‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ फेम सोनूचा डांस पाहून चाहते झाले चकीत

Subscribe

व्हायरल व्हिडिओमध्ये पलक अपल्या डांस टिचर सोबत वहीदा रहमान यांच्या 'पिया तो से' या प्रसिद्ध गाण्यावर डांस करताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांची लाडकी मालिका ठरली आहे. गेल्या एक दशकापेक्षा जास्त टेलिव्हिजनद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गोकूळधाम सोसायटीमध्ये घडणाऱ्या अनेक गंमती जंमती या मालिकेत दाखवल्या जातात. मालिकेमधील प्रत्येक पात्र पेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.मालिकेतील जेठालाल, तारक, दयाबेन, भिडे, बबिताजी अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कलाकारांनी साकारलेल्या पात्रामुळे आज त्यांची ओळख आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. सध्या सोशल मीडियावर या मालिकेत सोनू ही महत्वपुर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीने देखील अल्पवधीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पलक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचे इंस्टग्रामवर तब्बल 1 मिलियान फॉलोवर्स आहे. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. नुकतच सोशल मीडियावर पलकचा एक व्हिडिओ तूफान व्हायरल होतं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

- Advertisement -

या व्हायरल व्हिडिओमध्ये पलक अपल्या डांस टिचर सोबत वहीदा रहमान यांच्या ‘पिया तो से’ या प्रसिद्ध गाण्यावर क्लासिक डांस करताना दिसत आहे. आणि या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. खूप कमी लोकांना ठाऊक आहे की पलक एक उत्तम डांसर देखील आहे. मालिकेत सामान्य अशा पेहरावात दिसणारी पलक खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. पलक सिधवानी पुर्वी सोनूची भूमिका निधी भानूशाली हिने साकारली होती. निधीने शो मधून एक्जिट केल्यानंतर पलक आता सोनूच्या भूमिकेत गेले अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.


हे हि वाचा – ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने RRR सिनेमाचं ‘दोस्ती’ साँग चाहत्यांच्या भेटीला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -