Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनFarah Khan : फराह खान अडचणीत, हिंदू सणाचा अपमान केल्याप्रकरणी FIR दाखल

Farah Khan : फराह खान अडचणीत, हिंदू सणाचा अपमान केल्याप्रकरणी FIR दाखल

Subscribe

हिंदू धर्मात होळी सणाचे विशेष महत्व आहे. देशभरात ठिकठिकाणी विविध पद्धतीने हा पवित्र सण साजरा केला जातो. होळी आणि धूलिवंदन साजरा करण्याची पद्धत वेगळी जरी असली तरी आनंद मात्र सारखाच असतो. अशा पवित्र सणाविषयी बॉलिवूड सिनेनिर्माती, दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने अपमानास्पद टिप्पणी केली आहे. ‘होळी हा छपरींचा आवडता सण आहे’, या वक्तव्यामुळे फराह खान अडचणीत आली आहे. नुकतीच तिच्यावर हिंदू सणाचा अपमान केल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. माहितीनुसार, ‘हिंदुस्तानी भाऊ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकने वकिलामार्फत ही तक्रार दाखल केल्याचे समजत आहे. (Farah Khan in trouble due to insulting comment on Holi festival)

फराह खानविरुद्ध FIR दाखल

सध्या फराह खान ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात होस्टिंग करताना दिसतेय. या कार्यक्रमाच्या एका भागात फराहने होळी सणाबाबत वादग्रस्त कमेंट केली आहे. तिच्या आक्षेपार्ह कमेंटचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

रिपोर्टनुसार, २० फेब्रुवारी रोजी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोच्या एका भागात फराहने होळीचा उल्लेख ‘छपरींचा आवडता सण’ असा केलाय. तिच्या या वादग्रस्त कमेंटबद्दल शुक्रवारी खार पोलीस ठाण्यात हिंदुस्तानी भाऊने वकिलामार्फत FIR दाखल केली.

हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या

यामध्ये त्याने म्हटलंय, ‘फराह खान यांच्या वक्तव्यामुळे त्याच्या वैयक्तिक धार्मिक भावना आणि हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत’. हिंदुस्तानी भाऊच्या वकिलाने याबाबत सांगितले, ‘माझे अशिल म्हणतायंत की फराह खानच्या टिप्पणीने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान झालाय. पवित्र सणाचे वर्णन करण्यासाठी छपरी शब्दाचा वापर करणे अनुचित आहे. यामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो. या वक्तव्यामुळे माझ्या अशिलाच्या वैयक्तिक धार्मिक भावना दुखावल्या असून हिंदू समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. हे वक्तव्य करणाऱ्या फराह खान एक आघाडीच्या बॉलिवूड सिनेनिर्मात्या आणि कोरिओग्राफर आहेत. त्यांनी हिंदूचा सणाविषयी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणे चुकीचे आहे. म्हणून या तक्रारीद्वारे आम्ही न्यायाची मागणी करतो’.

सोशल मीडियावर संतापाची लाट

सोशल मीडियावर फराह खानचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत आपला संताप दर्शवला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘हिला कुणीतरी सांगा.. होळी हा केवळ नसून प्रेम, एकता आणि परंपरेचा उत्सव आहे’. तर अन्य एकाने लिहिलं, ‘हिंदू सणांचा अनादर करणे ही काही लोकांची प्रवृत्ती बनली आहे, परंतु आम्ही आमच्या संस्कृतीवर अज्ञानी लोकांना वर्चस्व गाजवू देणार नाही’. आणखी एकाने लिहिलं, ‘होळीची चेष्टा करणे म्हणजे लाखो लोकांच्या आनंदाची चेष्टा करण्यासारखं आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’.

हेही पहा –

Chhaava Fame Vineet Kumar Singh : छावामध्ये कवी कलश साकारणारा अभिनेता आहे डॉक्टर