फराह खानने सांगितलं करण जोहरच्या ‘तरुणपणाचं रहस्य’

निर्माता करण जोहर हा फिटनेस फ्रीक आहे

farah khan share a glimpse of karan johar's breakfast plate at set of rocky or rani ki prem kahani satyameva jayate 2,
फराह खानने सांगितलं करण जोहरच्या 'तरुणपणाचं रहस्य'

बॉलिवूड निर्माता करण जोहर आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान सध्या एकत्र शुटींग करत आहेत. दिल्ली येथे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या आगामी सिनेमाचे शुटींग सुरू आहे. करण आणि फराह यांची अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहेत. दोघेही सिनेमाच्या शुटींगदरम्यान फार धम्माल करताना दिसत आहे. फराह खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. फराह शुटींगच्या सेटवर कोरिओग्राफी करत असताना दुसरीकडे मात्र करण जोहरच्या तरुणपणाचे रहस्य सांगत आहे. फराहने तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीमध्ये करण जोहरचा नाश्ता करतानाचा एक व्हिडिओ शेअर करणच्या तरुणपणाचे रहस्य सांगितले आहे.

आपण पाहिले तर निर्माता करण जोहर हा फिटनेस फ्रीक आहे. करण नेहमीच फ्रेश मूड आणि ग्लमरस लुकमध्ये असतो. त्यामुळे त्याच्याकडे पाहिल्यावर अनेकांना आपण त्याच्यासारखं व्हाव असं वाटतं. फराहने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण एका खुर्चीत बसलेला दिसतोय. शेफ करणसाठी नाश्ता घेऊन येतो. त्यावर फराह म्हणते ‘सेटवर करणचा असा नाश्ता येतो. करण तु हा नाश्ता खातोस का?’ त्यावर करण म्हणतो, ‘अक्षयकडून तयार करण्यात आलेल्या स्वास्थ पदार्थांचे हे मिश्रण आहे. हे पदार्थ मला पोषक तत्व देतात त्यामुळे माझी त्वचा नेहमी तजेलदार राहते हेच माझ्या तरुणपणाचे रहस्य’, असल्याचे करण सांगतो.

फराहने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करणच्या नाश्ताच्या प्लेटमध्ये भरपूर हिरव्या भाज्यांचे टॉपिंग दिसत आहे. फराह देखील करणचा नाश्ता पाहून अवाक झाल्याचे दिसत आहे. फराहने शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक सेलिब्रेटींनी रिअँक्शन्स दिल्या आहेत. अभिनेता रणवीर कपूरने ‘क्यूटीज’ अशी कमेंट केलीय तर कोरिओग्राफर गीता कपूरने ‘मी माझं सगळ प्रेम पाठवते’ असं म्हटलंय. करण आणि फराह अनेक वर्षांनी एकाच सिनेमासाठी एकत्र काम करत आहेत. २०१२मध्ये त्यांनी स्टुडंट ऑफ द इअर या सिनेमात एकत्र काम केलं होतं.


हेही वाचा – Salman Khan ने सेलिब्रेट केला वडिल सलीम खान यांचा ८६वा वाढदिवस