Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन फरहान अख्तर झाला बॉक्सर

फरहान अख्तर झाला बॉक्सर

फरहान अख्तरचा 'तुफान' येत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरच्या तुफान या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून २१ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफानमध्ये फरहान अख्तर हा बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या अगोदर त्याने ‘भाग मिल्खा भाग’ या दर्जेदार चित्रपटात काम केले आहे. फरहान अख्तरची या चित्रपटातील भूमिकाही लोकप्रिय आहे. फरहान अख्तर याने या भूमिकांसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘तुफान’ कींवा ‘भाग मिल्खा भाग’ या दोन्ही चित्रपटांच्या भूमिकेतून फरहान अख्तरची मेहनत, जिद्द आणि चिकाटी दिसून येते. अभिनेता फरहान अख्तर इतक्या सरावानंतर आणि मेहनतीनंतर बॉक्सर झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)


‘भाग मिल्खा भाग’ या २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांमध्ये फरहान अख्तर याने प्रसिद्ध धावपटूची भूमिका साकारली होती. हे प्रसिद्ध धावपटू म्हणजेच पद्मश्री पुरस्कार विजेते मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून, त्यांची भूमिका साकारण्यासाठी फरहान अख्तरने प्रचंड मेहनत घेतली. या उन्हाळ्यासाठी हवामान अंदाज, एपिक ब्लॉकबस्टर असं म्हणत फरहान अख्तरचा ‘तुफान’ येत आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहराने यांनी केले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – सरकारमध्येही लॉकडाऊनला विरोध, पण परिस्थितीनुसारच निर्णय घेणार – राजेश टोपे

- Advertisement -