आतापर्यंत एवढी भीती वाटली नव्हती – शिबानी दांडेकर

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड आणि सुपर मॉडेल शिबानी दांडेकर हिने सुद्धा तिच्या सोबत नुकतीच घडलेली एक घटना शेअर केली.

will Farhan and Shibani get married soon?
यंदा कर्तव्य आहे, फरहान-शिबानी अडकणार विवाह बंधनात?

सध्या देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे हैदराबाद, उन्नाव प्रकरणं घडत असताना एका अभिनेत्रीला देखील रोडरोमिओच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याची घटना घडली. तो अनुभव तिने शेअर केला होता. आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड आणि सुपर मॉडेल शिबानी दांडेकर हिने सुद्धा तिच्या सोबत नुकतीच घडलेली एक घटना शेअर केली.

हे सर्व काय होत आहे?

अभिनेत्री शिबानी दांडेकरने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शिबानीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. ती म्हणाली की, “आपण नेहमी वाचतो, ऐकतो की आज एका महिलेसोबत, मुलीसोबत गैरवर्तन झालं किंवा बलात्कार झाला किंवा कोणाची हत्या करण्यात आली. हे खूप भयंकर, निंदनीय आणि भीतीदायक आहे. मला अनेकदा समजत नाही की, हे सर्व काय होत आहे? प्रगतीच्या नावाखाली आपण कुठे जात आहोत? असे सवाल तिने यावेळी उपस्थित केले.

…तेव्हा माझ्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली

शिबानी पुढे म्हणाली की, “काही दिवसांपूर्वी माझ्यासोबत सुद्धा अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी माझ्या मनातसुद्धा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मी मुंबईत रहायला आल्यापासून आतापर्यंत कधीच मला अशी भावना निर्माण झाली नव्हती. काही आठवड्यांपूर्वी मी रात्रीच्या वेळेस मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर आले. त्यावेळी आजूबाजूला पाहिले असता मला माझी कार सापडत नव्हती. त्यावेळी मला रस्त्यावर चालण्याचीही भीती वाटत होती. त्यावरुन मला एक गोष्ट जाणवली की रोज अनेक महिला या भीतीतून कशा जात असतील. हे सर्व कसं सहन करत असतील.”

महिलांवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष करु नये

शिबानी पुढे सांगते की, “आज आपण कुठेच सुरक्षित नाही. ना आपल्या घरात, ना देशात ना आपल्या मातीत. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढतच आहेत. याकडे दुर्लक्ष करता कामा नये.”