Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding: फरहान - शिबानी मार्चमध्ये विवाह!

Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding: फरहान – शिबानी मार्चमध्ये विवाह!

Subscribe

फरहान ( Farhan Akhtar ) आणि शिबानी (Shibani Dandekar ) मार्च २०२२मध्ये मुंबईतच शानदार विवाह सोहळा आयोजित करणार आहे. मुंबईतील त्यांचे जवळचे मित्र मैत्रीणी आणि कुटुंबातील सदस्य दोघांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

२०२१ वर्ष बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नांनी गाजले. २०२२ मध्ये देखील सेलिब्रेटींच्या लग्नाचा सिलसिला काही थांबलेला नाही. विक्की कौशल (Vicky Kaushal )  कतरिना कैफ (Katrina Kaif ) नंतर आता अभिनेचा फरहान अख्तर ( Farhan Akhtar ) आणि मराठमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar ) हे देखील लग्न करणार आहेत. येत्या मार्च महिन्यात दोघेही विवाहबंद्ध होणार आहेत. ( Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding)  मीडिया रिपोर्टनुसार, फरफान आणि शिबानी यांच्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. त्यामुळे बॉलिवूडचे हे कपल आता आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत.

फरहान आणि शिबानी मार्च २०२२मध्ये मुंबईतच शानदार विवाह सोहळा आयोजित करणार आहे. मुंबईतील त्यांचे जवळचे मित्र मैत्रीणी आणि कुटुंबातील सदस्य दोघांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. फरहान आणि शिबानी त्यांचे लग्न विक्की कतरिना सारखे फार गुप्त ठेवणार आहेत असे देखील म्हटले जात आहे. दोघांनी २०२१मध्येच लग्नाचा घाट घातला होता. मात्र कोरोनामुळे त्यांना लग्न पुढे ढकलावे लागले होते. परंतु आता फरहान आणि शिबानीला त्यांचे लग्न आणखी पुढे ढकलायचे नाहीये. त्यामुळे जवळचे मित्र मैत्रीणी आणि नातेवाईकांमध्ये दोघेही लग्नासोहळा उरकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

- Advertisement -


शिबानी आणि फरहान मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये लग्नाचे बुकींग केले आहेत. लग्नाचे वेन्यू, डेकोरेशन देखील फायलन केले आहे. विक्की आणि कतरिना प्रमाणे फरहान आणि शिबानी यांचे डिझायनर आऊटफिट्स फायनल केले आहेत. दोघेही सब्यसा ब्रॅडचे डिझायनर पेस्टल रंगांचे आउटफिट्स घालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिबानी आणि फरहान अख्तर यांची जोडी सिनेजगतात आणि सोशल मीडियावर हीट आहेत. मागच्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. शिबानीने फरहानच्या नावाचा टॅटू देखील काढला आहे. मधल्या काळात तिच्या टॅटूची देखील फार चर्चा रंगली होती. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. दोघांना अनेक फॅमिली फंक्शन्स, पार्ट्यांमध्ये देखील एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

- Advertisement -

वर्षाच्या सुरुवातीलाच फरहान आणि शिबानी यांनी लग्नाची गोड बातमी दिली आहे. बॉलिवूडच्या इतर लग्नांप्रमाणे शिबानी आणि फरहान यांचे लग्न देखील हीट होईल यात काही शंका नाही.


हेही वाचा – Katrina लग्नानंतर हॉट अवतारात, ओव्हर साइज स्वेटर अन् मंगळसूत्राने वेधले लक्ष

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -