Farhan Akhtar Shibani Dandekar यांच्या लग्नाची तारीख ठरली! जावेद अख्तरनी केली घोषणा

जावेद अख्तर यांनी होणाऱ्या सुनेचे कौतुक करत म्हटले. शिबानी फार चांगली मुलगी आहे आणि आम्हाला ती आमची सून म्हणून पसंत आहे.

Farhan Akhtar Shibani Dandekar wedding
Farhan Akhtar Shibani Dandekar यांच्या लग्नाची तारीख ठरली! जावेद अख्तरनी केली घोषणा

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर ( Farhan Akhtar ) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar ) आणि फरहान अख्तर यांनी जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. ( Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding ) अखेर आता त्यांच्या लग्नाची तारीख ठरली असून फरहानचे वडील जावेद अख्तर यांनी स्वत: मुलाच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. येत्या १२ फेब्रुवारीला फरहान आणि शिबानी लग्नबंधनात अडकणार आहेत.

जावेद अख्तर यांनी बॉम्बे टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी येत्या १२ फेब्रुवारीला रजिस्टर पद्धतीने लग्न करणार असून लग्नाचे ग्रँड रिसेप्शन त्यांच्या खंडाळ्याच्या फार्महाऊस होणार आहे. जवळचे मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासोबत हा सोहळा पार पडणार आहे. शिबानी आणि फरहानी यांना मोठ्या थाटात लग्न करायचे होते. दोघेही त्यांच्या लग्नासाठी फार उत्साही होते. मात्र त्यांना छोटेखानी लग्नासोहळा उरकून त्यातच आनंद मानावा लागणार आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आम्ही मोठ्या स्तरावर कोणतेही सेलिब्रेशन करणार नाही असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

जावेद अख्तर यांनी होणाऱ्या सुनेचे कौतुक करत म्हटले. शिबानी फार चांगली मुलगी आहे आणि आम्हाला ती आमची सून म्हणून पसंत आहे. फरहान आणि शिबानी एकमेकांचे फार चांगले मित्र मैत्रिणी आहेत ती त्यांच्या नात्यातील फार चांगली गोष्ट आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी १२ फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार असून एप्रिलमध्ये खंडाळ्याच्या फार्महाऊसवर ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. दोघांच्या घरचे आता लग्नाच्या तयारी लागले आहेत. फरहान शिबानी लग्नात कसे दिसणार याकडेही आता त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे.


हेही वाचा – Coronavirus : अभिनेत्री जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह ; करण जोहरच्या सिनेमाचं शूटिंग…