घरमनोरंजनFarhan Akhtar आणि Shibani Dandekar अखेर अडकले लग्नबंधनात

Farhan Akhtar आणि Shibani Dandekar अखेर अडकले लग्नबंधनात

Subscribe

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल, अभिनेत्री शिबानी दांडेकर अखेर आज लग्नबंधनात अडकले आहेत. खंडाळ्यातील एक फार्महाऊसवर दोघांचा एक ग्रॅण्ड वेडिंग सोहळा पार पडला आहे. यावेळी फराहान अख्तरचे वडील जावेद अख्तर यांनी लग्नातील विविध गोष्टींकडे जातीने लक्ष दिले आहे. फरहानचा अगदी जवळचा मित्र अभिनेता ह्रतिक रोशन देखील कुटुंबियांसह या लग्नसोहळ्याचा हजर झाला होता. या लग्न सोहळ्यातील काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे शिबानी दांडेकर आता अख्तर कुटुंबाची सून झाली आहे. आता सोशल मीडियावरही चाहते फरहान आणि शिबानीला लग्नानंतरच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे परफेक्ट कपल वाटत आहे. दोघांचे लग्न हे त्यांच्या चाहत्यांसाठी यापेक्षा दुसरी वीकेंड ट्रीट असू शकत नाही. दोघांमधील प्रेम आयुष्यभर असेच अखंड राहो हीच प्रार्थना चाहत्यांकडून केली जातेय. फरहानचा सूट बुटमधील लूकमध्ये एक हँडसम दिसतोय, तर शिबानी रेड अँड बेज रंगाच्या गाऊनमध्ये कमालाची सुंदर दिसतेय. शिबानीने एका सुंदर रेड नेटने तिचा लग्नाचा लूक पूर्ण केला आहे. या लग्न सोहळ्यात फरहान-शिबानीने डान्स करत आनंद घेतला. ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

- Advertisement -

जवळपास 4 वर्षे डेट केल्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी 19 फेब्रुवारी रोजी लग्न केले. दोघांचे लग्न खंडाळा येथील अख्तर कुटुंबीयांच्या फार्म हाऊसवर पार पडले. या जोडप्याने हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने लग्न न करता जरा हटके करण्याचे ठरवले होते. शिबानी आणि फरहानने VOW आणि रिंगण सेरेमनी करत एकमेकांना सात आयुष्यासाठी आधार देण्याचा निर्णय घेतला. फरहान-शिबानीची प्रेमकहाणी एका रिअॅलिटी शोमधून सुरू झाली. जिथे फरहान शोचा होस्ट होता आणि शिबानी स्पर्धक होती. हळूहळू त्यांची प्रेमकहाणी पुढे सरकत गेली. सुरुवातीला या जोडप्याने त्यांचे नाते सिक्रेट ठेवले. मात्र आता लग्न करत हे नाते त्यांनी जग जाहीर केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -