बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कपल असलेल्या फरहान अख्तर (Farhan Akhtar ) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांनी नवीन वर्षात त्यांच्या लग्नाची खुशखबर त्यांच्या चाहत्यांना दिली. 2018 पासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या रिलेशनशिपची सोशल मीडिया आणि बिबी टाऊनमध्ये कायमच चर्चा होत राहिली आहे. फरहान अख्तर हा प्रसिद्ध गायक आणि लेखक जावेद अख्तर यांचा मुलगा आहे हे सर्वांनाच माहिती आहे. फरहान वडिलांमुळे प्रसिद्ध होताच मात्र बॉलिवूडमध्ये त्याने स्वत: अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर शिवानी दांडेकरने देखील तिच्या क्षेत्रात तिची ओळख बनवली आहे. शिबानी सक्सेफुल अभिनेत्री आहेच मात्र ती एक फेमस मॉडेल आणि अँकर देखील आहे. कशी आहे शिबानी दांडेकरची कहाणी जाणून घेऊया.
View this post on Instagram
शिवानी दांडेकर ही मराठी कुटुंबात जन्मलेली मराठमोळी मुलगी. शिबानीचा जन्म २७ ऑगस्ट १९८०रोजी पुण्यात झाला. मात्र शिबानीचे संपूर्ण बालपण हे ऑस्ट्रेलियामध्ये गेले. त्यानंतर ती न्यूयॉर्कमध्ये आली. शिबानीने भारतातच नाही तर परदेशातही तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. शिबानी भारतीय आणि ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि अँकर तसेच मॉडेल आहे. शिबानीच्या करिअरची सुरुवातही ऑस्ट्रेलियामध्ये झाली. अमेरिकन टेलिव्हीजनवर अँकर म्हणून शिबानीने कामाला सुरुवात केली. त्यानंतर ती भारतात परतली आणि तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. त्याचप्रमाणे हिंदी टेलिव्हीजनवर अनेक प्रसिद्ध शोमध्ये शिबानीने कामे केली. अनेक कार्यक्रमांचे अँकरिंग केले. २०१९च्या क्रिकेट विश्वचषकाच्या खास पाहुण्यांपैकी शिबानी दांडेकर ही एक होती. सोनी मॅक्स टीव्हीच्या आयपीएल एक्स्ट्रा इनिंग शोची शिबानी अँकर होती.
रॉय या सिनेमातून शिबानीने सिनेक्षेत्रात पदार्पण केले. तसेच टाइमपास या मराठी सिनेमातही शिबानी दिसली होती. ही पोरी साजूक तुपातली हे शिबानीवर चित्रीत करण्यात आलेले गाणे चांगलेच गाजले होते.
View this post on Instagram
शिबानीला दोन बहिणी आहेत. दोन बहिणींमध्ये शिबानी सर्वांत मोठी बहीण आहे. शिबानीची एक बहीण अनुषा दांडेकर ही हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री आणि गायिका आहे. तर तिच्या धाकट्या बहिणीचे नाव अपेक्षा दांडेकर असे आहे. शिबानीला लहानपणापासून संगीताची विशेष आवज आहे. शिबानी उत्तम गायिका देखील आहे. शिबानीने स्वत:चा एक डी मेजर नावाचा एक बँड देखील सुरू केला आहे.
फरहान आणि शिबानी यांची पहिली भेट ही एका रिअँलिटी शो दरम्यान झाली होती. शिबानी त्या शोमध्ये स्पर्धक होती आणि फरहान शोचे अँकरिंग करत होता. शो दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झा
ले. शिबानीने फरहान सोबतचा एक फोटो शेअर करत दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले. फरहानने देखील दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. खरंतर फरहानचे शिबानीसोबतचे हे दुसरे लग्न असणार आहे.१६ वर्षांचा संसार मोडून फरहान शिबानीसोबत रिलेशनशिपमध्ये आला होता. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात.
हेही वाचा – Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding: फरहान – शिबानी मार्चमध्ये विवाह!