घरCORONA UPDATEफरहान अख्तर लॉकडाऊनमध्ये करतोय आपल्या आगामी चित्रपटाची तयारी!

फरहान अख्तर लॉकडाऊनमध्ये करतोय आपल्या आगामी चित्रपटाची तयारी!

Subscribe

फरहान अख्तर केवळ एक अभिनेता नसून आपल्या व्यक्तिरेखेला मेहनतीच्या जोरावर जीवंत करणारा कलाकार आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाने हे सिद्ध केले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा पडद्यावर हुबेहूब साकारणारा फरहान, नेहमीच आपल्या दर्शकांसोबत एक असे नाते निर्माण करतो की दर्शक त्याच्या ऑन-स्क्रीन व्यक्तीरेखेसोबत जोडला जातो. आपला आगामी चित्रपट ‘तुफान’मधील बॉक्सरच्या भूमिकेसाठी व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षण घेतल्यानंतर, फरहानने आता बॉक्सिंगला आपल्या घरीच दैनंदिन फिटनेस मध्ये सामील करून घेतले आहे.

- Advertisement -

बॉक्सिंग हा सोपा खेळ नाही. यामध्ये आपल्या प्रत्येक असहज हालचालींमध्ये सहजता आणावी लागते. याच्या नियमित सरावासोबतच जसा जसा काळ जाईल तसा तसा आपण मारलेल्या प्रत्येक पंचवर प्रभुत्व मिळवावे लागते फरहानने नेहमीच स्वतःला सर्वोत्तम आणि प्रत्येक प्रोजेक्टसाठी सर्वथा योग्य सिद्ध केले आहे. त्याने आपल्या सर्वोत्तम प्रदर्शनाने आणि दमदार भूमिकांच्या जोरावर नेहमीच स्वत:ला आव्हान देत उत्तम काम करणे सुरूच ठेवले आहे. फरहान वास्तवात एक सामर्थ्यशाली अभिनेता आहे आणि प्रत्येक वेळी आपल्या अद्भुत प्रदर्शनाने दर्शकांचे मन जिंकत आले आहेत.

- Advertisement -

फरहान “तूफ़ान” सोबत बॉक्सिंग रिंगमध्ये उतरायला पूर्णपणे सज्ज झाला आहे. आरओएमपी पिक्चर्ससोबत एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शन चा हा चित्रपट “तूफ़ान” राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित करीत असून १८  सप्टेंबर २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

महेश बाबू पण आहे स्क्रीप्ट वाचण्यात मग्न

महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता  आहे. आजपर्यंत त्याला लोकप्रियतेच्या जोरावर प्रत्येक चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती आहे. सध्याच्या काळात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक-डाउन आहे आणि याचा फायदा घेत अनेक चित्रपट निर्मात्यांनी महेश बाबूकडे आपल्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट्स पाठवायला सुरुवात केली आहे. महेश बाबू यावेळी आपल्या घरीच वेळ घालवत आहे त्यामुळे त्यांच्याकडे या स्क्रिप्ट वाचण्यासाठी नक्कीच वेळ असेल, याची या निर्मात्यांना खात्री आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -