घरमनोरंजनइंदूरच्या वादळात फरहान अख्तरच्या लाइव्ह कॉन्सर्टचा सेट कोसळला; व्हिडीओ व्हायरल

इंदूरच्या वादळात फरहान अख्तरच्या लाइव्ह कॉन्सर्टचा सेट कोसळला; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर सध्या त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. फरहानचा इंदूरमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट होणार होता, त्यासाठी भव्य सेट देखील तयार करण्यात आला होता. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये फरहानच्या कॉन्सर्टचा सेट वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दिसत आहे. खरं तर, इंदूरमधील जोरदार वादळामुळे कॉन्सर्टसाठी तयार केलेला सेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर नेटकरी आपला संताप व्यक्त करत आहेत. ते या सेटच्या वेंडरवर टीका करत आहेत. यात एक युजर म्हणाला- “हे इंदूर आहे भाऊ, इथे फक्त कीर्तनच चालू शकतं.”
दरम्यान, सध्या फरहान अख्तर इंदूरमध्ये आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिलंय की, आज संध्याकाळी #Indore मध्ये, हॉटेलच्या खोलीच्या खिडकीतून डोकावले, तो एक सुंदर मेळावा होता. मला आशा आहे की यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल.

- Advertisement -

फरहानचे आगामी चित्रपट

फरहान अख्तर त्याच्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटात प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. याशिवाय तो ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव दिसणार आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

प्रियंका चोप्राने लेकीसोबत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -