बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर बहुचर्चित “तुफान” चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने फरहान अख्तरसह परेश रावल यांचा एक जबरदस्त फोटो शेअर केल आहे. ‘तुफान’ मध्ये फरहान अख्तर हा बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळे फरहान या भूमिकेला योग्य न्या देण्यासाठी अधिक मेहनत घेतली आहे. मुंबईतील डोंगरी भागातील एका मुलाच्या आयुष्यावरील बेतलेला हा चित्रपट आहे. तो अंडरवर्ल्डच्या काळ्या जगापासून स्वत:ला वेगळे ठेवत, एक ध्येय ठरून स्वत:ची एक छबी तयार करतो.
View this post on Instagram
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतचं ‘तुफान’ या बहुचर्चित, प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंट (रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर) आणि आरओएमपी पिक्चर्स (राकेश ओमप्रकाश मेहरा) यांची निर्मिती असलेला तुफान हा या वर्षातील सर्वात भव्य स्पोर्ट्स ड्रामा ठरणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तरसह मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन अगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.