Farmer Protest: रिहानाच्या ट्विटवर सलमान खानची ‘दबंग’ रिॲक्शन

म्युझिक शो दरम्यान सलमानने मांडले मत

Farmer Protest: Salman Khan reaction on Rihanna's tweet #IndiaTogether
Farmer Protest: रिहानाच्या ट्विटवर सलमान खानची 'दबंग' रिअॅक्शन

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणाचे शेतकरी मागील ३ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलनक करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळत आहे. परंतू आता परदेशातील सेलिब्रेटींनीही समर्थन दिले आहे. परदेशातील सेलिब्रेटींनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यांनंतर भारतीय सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी परदेशातून केलेल्या समर्थनाला विरोध केला आहे. सचिन तेंडूलकर, विराट कोहली, कंगना रणौत, अक्षय कुमारसह इतर सेलिब्रेटींनी परदेशी समर्थनाला विरोध दर्शवला आहे. शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत वाद असून बाहेरच्या व्यक्तींनी याचा प्रचार करु नये असे सेलेब्रिटींनी म्हटले आहे. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानने एक वक्तव्य केले आहे.

सलमान खानला शेतकरी आंदोलनाबाबत विचारले. यावर उत्तर देताना सलमान म्हणाला योग्य निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुद्यावर योग्य निर्णय झाला पाहिजे. असे सलमान खानने म्हटले आहे. एका म्युझिक शो दरम्यान सलमानने आपले मत मांडले आहे.

शेतकरी आंदोलनावर अमेरिकी पॉपस्टार रिहानाने ट्विट करत टीका केली होती. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. यानंतर हे प्रकरण अधिकच चर्चिले गेले आहे. रिहानाच्या विरोधात भारतीय सेलिब्रेटींनी ट्विट केले आहे. परदेशी सोशल एक्टिव्हिस्ट ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफानेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.

भारतीय सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलन हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असून तुम्ही त्याचा प्राचार करु नका असे परदेशी समर्थकांना म्हटले आहे. आतापर्यंत अजय देवगन, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि खेळाडू विराट कोहली या सर्वांनी #IndiaTogether असे हॅशटॅग वापरले आहे.