घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांनी जान्हवी कपूरच्या चित्रपटाची थांबवली शूटिंग!

शेतकऱ्यांनी जान्हवी कपूरच्या चित्रपटाची थांबवली शूटिंग!

Subscribe

यापूर्वी देखील अभिनेत्री जान्हवी कपूरच्या चित्रपटाचे शूटिंग शेतकऱ्यांनी थांबवले होते.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा चित्रपट ‘गुड लक जेरी’ खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाची शूटिंग पंजाबमध्ये होत आहे. पण आता या चित्रपटाची शूटिंग पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी थांबवल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, शेतकरी आंदोलनातील एक गट पटियालामध्ये शूटिंग होणाऱ्या सेटवर पोहोचला. ज्यानंतर तिथे शेतकऱ्यांनी हंगामा केला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी ही घटना पटियालामध्ये झाली. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगविरोधात घोषणाबाजी केली आणि नंतर हॉटेलच्या बाहेर देखील घोषणाबाजी केली. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने हॉटेलमधून बाहेर यावे आणि कृषी कायद्याविरोधात आपला विरोध दर्शवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

चित्रपटातील कलाकारांनी कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाला समर्थन करावे, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. फक्त जान्हवी कपूर नाही तर इतर बॉलिवूड कलाकारांनी पण शेतकऱ्यांसाठी समर्थन करण्याकरता पुढे यावे. दरम्यान जान्हवी कपूरच्या ‘गुड लक जेरी’ चित्रपटाची शूटिंग थांबवणे, हे दुसऱ्यांदा घडले आहे. यापूर्वी ११ जानेवारीला शेतकऱ्यांचा एका गट फतेहगढ साहिब जवळील बस्सी पठाणमध्ये शूटिंगच्या ठिकाणी पोहोचला होता. अभिनेत्रीने कृषी कायद्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

- Advertisement -

जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर २०१८मध्ये जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मराठीतील ‘सैराट’ या चित्रपटाचा ‘धडक’ हा रिमेक होता. ‘धडक’ या चित्रपटात जान्हवी अभिनेता ईशान खट्टरसोबत दिसली होती. यानंतर नेटफ्लिक्सवर जान्हवीचा ‘घोस्ट स्टोरीज’ आणि ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ चित्रपट रिलीज झाला. शिवाय जान्हवी आता ‘दोस्ताना २’, ‘रुही अफ्जा’ आणि ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे.


हेही वाचा –  त्याने असं काही केलं त्यामुळे राखी सावंतला करावं लागलं अर्जंट लग्न!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -