घरताज्या घडामोडीFast & Furious 9 ट्रेलर रिलिज; व्हिन डीझेल आणि जॉन सीना आमने-सामने

Fast & Furious 9 ट्रेलर रिलिज; व्हिन डीझेल आणि जॉन सीना आमने-सामने

Subscribe

फास्ट अँड फ्यूरियस फ्रेंचाइजीचा ९व्या सीरिजचा ट्रेलर रिलिज झाला आहे. या चित्रपटचा ट्रेलर धमाकेदार आहे. ट्रेलमध्ये फाइट सीन्स आणि दमदार कार्सचे प्रदर्शन केले गेले आहे. या चित्रपटात व्हिन डीझेल (Vin Diesel) आपल्या भावासोबत आमने-सामने असणार आहे. व्हिन डीझेलच्या भावाची भूमिका जॉन सीना करत आहे.

चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जे फास्ट अँड फ्यूरियसचे चाहते आहे, त्यांना ट्रेलरमध्ये लोकांना सर्व काही पाहायला मिळत आहे. ३.५९ मिनिट ट्रेलरमध्ये दमदार फाइड सीन्स आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जस्टिन लिनने केले आहे. यापूर्वी जस्टिनने या सीरिजचा ३, ४, ५ आणि ६ चे दिग्दर्शन केले आहे.

- Advertisement -

या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूपच आवडत आहे. चित्रपटाची कहाणी पूर्वीपेक्षा आणखीन रंजक करण्यासाठी निर्मात्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात जॉन सीनाचे काम खूपच भारी दिसत आहे. तो चित्रपटात फिट दिसत आहे. तर चार्लीझ थेरॉनने सिफय सायबर दहशतवाही म्हणून भूमिका पुन्हा करत आहे. आतापर्यंत या ट्रेलरला ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ६० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Viral Video: लॉकडाऊन नाही आहे का? रणबीरचा पापाराझींना सवाल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -