घरमनोरंजन'साहो' चित्रपटात 'हा' अभिनेता करतोय खलनायकाची व्यक्तिरेखा

‘साहो’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता करतोय खलनायकाची व्यक्तिरेखा

Subscribe

साहो चित्रपट निर्मातीच्या चमूने आज खलनायकाचा फस्ट लुक शेअर केला. या चित्रपटात खलनायकाची व्यक्तिरेखा नील नितीन मुकेश करणार आहे.

‘कत्ती’ या चित्रपटात खलनायकाची व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेता नील नितीन मुकेश नव्या खलनायच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साहो’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या चमूने आज नील नितीन मुकेश याचा फस्ट लुक जाहीर केला आहे. ‘साहो’ हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर साहो हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जवळपास २ वर्षाच्या कालावधीनंतर प्रभासचे चाहते ‘साहो’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

‘साहो’ या चित्रपटाचा टिझर १३ जूनला प्रदर्शित करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील प्रदर्शित झालेल्या दोन गाण्यांना सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच निर्मात्यांनी सिने-रसिकांसाठी एक खास भेट आणली आहे. ‘साहो’ चित्रपटावर आधारित एक मोबाईल गेम तयार करण्यात आला असून लवकरच लॉन्च केला जाणार आहे. ‘साहो दि गेम’ या नावाने हा मोबाईल गेम तयार करण्यात आला आहे. साहोच्या टिझर प्रमाणेच मोठे अॅक्शन सिक्वेन्सचा या खेळात समावेश करण्यात आला आहे. या स्टाईलिश खेळाची निमिर्ती पिक्सालॉट लॅब्सस द्वारे करण्यात आली आहे.

‘साहो’ची निर्मिती यु व्ही क्रीएक्शन या प्रमुख निर्मिती संस्थेच्या अंर्तगत झाली असून टी सिरीज आणि अनिल थडानी यांची संस्था ए.ए. फिल्म्स सुद्धा या चित्रपटात सहभागी आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत रेड्डी यांनी केलं आहे. चित्रपटात प्रभाससह श्रद्धा कपूर, मंदिर बेदी, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश सारखे सुविख्यात अभिनेते असून शंकर-एहसान -लॉय यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -