घरमनोरंजनवयाच्या तिसऱ्या वर्षी लैंगिक अत्याचार, बॉलिवूडचे कास्टिंग काउच; दंगल गर्ल फातिमाचे धक्कादायक...

वयाच्या तिसऱ्या वर्षी लैंगिक अत्याचार, बॉलिवूडचे कास्टिंग काउच; दंगल गर्ल फातिमाचे धक्कादायक अनुभव

Subscribe

बॉलिवूडमधील दंगल गर्ल म्हणून ओळख असलेली अभिनेत्री फातिमा शेख तिच्या हटके स्टाईल आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा सतत अँटिव्ह असते. नवनवे फोटो, व्हिडिओ ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. मात्र वयाच्या तिसऱ्या वर्षी फातिमाला लैंगिक अत्याचाराला समोरं जाव लागलं होत. याशिवाय एक अभिनेत्री म्हणून वावरताना तिलाही बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचचे शिकार करण्यात आले.

फातिमाने शेअर केले आयुष्यातील धक्कादायक अनुभव

फातिना सना शेखने गेल्या वर्षी एका मुलाखतीमध्ये बाल वयात झालेले लैंगिक शोषण आणि बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. फातिमाने सांगितले की, ३ वर्षाची असताना तिचा वियनभंग झाला. मात्र स्त्रिया याविषयी कुठेही, कधी बोलू शकत नाही. पण आत्ताचा काळ बदलला आहे. कारण देशासह जगभरात लैंगिक छळाबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढली आहे. पूर्वी असं म्हटलं होत की, या सगळ्याबद्दल बोलू नका, कारण लोकांचा गैरसमज होईल.

- Advertisement -

कास्टिंग काऊचमुळे कित्येकदा काम गमावलं

फातिमाने बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचबद्दलही धक्कादाय़क खुलासा केला आहे. कास्टिंग काऊचमुळे तिला अनेकदा कामं गमवावं लागलं. यावर फातिमा सांगते की, मला अनेकदा तू नायिका बनू शकत नाही हे ऐकावलं लागलं. तू दीपिका पदुकोण किंवा ऐश्वर्या रायसारखी दिसत नाही. त्यामुळे तू नायिका कशी बनशील? असं म्हणत बरेचं लोक तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात. पण आज मी जेव्हा वळून पाहते तेव्हा वाटतं ठीक आहे. हे लोक सौंदर्याला एवढं महत्त्व देतात की, एखादी सुंदर दिसणारी मुलगीच अभिनेत्री बनू शकते. मी त्यांच्या सुंदरतेच्या प्रमाणात बसत नाही. पण आता अनेक संधी उपलब्ध आहेत. कारण माझ्यासारख्या सुपरमॉडल्ससारख्या न दिसणाऱ्या सामान्य आणि सरासरी दिसणाऱ्या लोकांसाठीही चित्रपट बनवले जातात.

सेक्स केल्यास तुम्हाला कामाची संधी

कास्टिंग काउचबद्दल बोलताना अभिनेत्री फातिमाने एक मोठं विधानं केलं. ती म्हणाली की, मी कास्टिंग काऊचचाही सामना केला आहे. आयुष्यात एकवेळ अशी आली आहे जेव्हा असं म्हटलं गेलं की, तुम्ही सेक्स कराल तरचं तुम्हाला काम मिळेल.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -