मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना वाईट वाटतंय… उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमेची भावनिक पोस्ट

"धन्यवाद उद्धव ठाकरे!!! तुमचा संपूर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी बंड केल्यामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसापासून राजकीय पेच निर्माण झाली होती. महाविकास आघाडी सरकारकडे पुरेसं पाठबळ नसल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा जाहीर केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते सेलिब्रेशन करत आहेत. या सर्व प्रकरणावर अनेक माध्यमातून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारही आपलं मत मांडत आहेत.

दरम्यान या सर्व प्रकरणावर आता मराठी अभिनेता हेमंत ढोमे याने सुद्धा उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबाबत आपले मत मांडले आहे. हेमंत ढोमेने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक भावनित पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलंय की,”धन्यवाद उद्धव ठाकरे!!! तुमचा संपूर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली… आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय… धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार…” अश्या भावनिक शब्दात हेमंत ढोमेने आपले मत मांडले आहे.

हेमंत ढोमेनेच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत, त्यापैकी एका युजरने लिहिलंय की,”खरंय कारण असा मुख्यमंत्री होणे नाही”. तर दुसऱ्याने “बेस्ट मुख्यमंत्री”, तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “उद्धव ठाकरे पुन्हा भरारी घेतील यात शंका नाही”. सध्या उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

 


हेही वाचा :आता ED कार्यालय बंद…मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आस्ताद काळेच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं उत्तर